औरंगाबाद : ‘जोर से बोलो, जय अग्रसेन’, ‘हर कोई बोलो, जय अग्रसेन’ अशा जयघोषाने गुरुवारची सकाळ दुमदुमली. छत्रपती श्री महाराजा अग्रसेन जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत संपूर्ण अग्रवाल समाज एकवटला होता. आबालवृद्धांचा उत्साह वाखाणण्याजोगा ठरला. शहागंजमधील गांधी पुतळा चौकात सकाळी सकल अग्रवाल समाज जमला होता. महिलांनी एकाच रंगातील साड्या परिधान केल्या होत्या. काही महिलांनी फेटेही बांधले होते. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते तिरंगी फुगे आकाशात सोडून या शोभायात्रेला सुरुवात झाली. यावेळी सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला. शोभायात्रेच्या अग्रभागी चार अश्व, दोन उंटांवर युवक बसले होते. त्यांच्यामागे अग्रसेन विद्यामंदिराचे विद्यार्थी लेझीम खेळत होते. काही विद्यार्थी हातात विविध रंगांतील झेंडे घेऊन स्केटिंग करीत होते. तसेच बँडपथकाच्या तालावर आबालवृद्ध मनसोक्त नृत्य करीत होते. तसेच कलाकार कच्छी घोडी नृत्य करीत होते. पुण्याहून आलेल्या कलाकारांनी कुचीपुडी नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अश्वरथाचे स्वरूप दिलेल्या वाहनात अग्रसेन महाराज व महाराणी माधवी देवी यांच्या वेशभूषेत गणेश अग्रवाल व शिल्पा अग्रवाल बसले होते. तसेच जालना रोडवरील अग्रसेन चौकात उभारण्यात आलेल्या स्तंभाचे कटआऊट एका वाहनात ठेवण्यात आले होते. उदंड उत्साहात शोभायात्रा सराफा रोड, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट, क्रांतीचौक, जालना रोडमार्गे अग्रसेन चौक व त्यानंतर कॅनॉट मार्केट परिसरातील अग्रसेन भवन येथे शोभायात्रा पोहोचली.या शोभायात्रेचे नेतृत्व अग्रवाल सभेचे अध्यक्ष डॉ. मनोहर अग्रवाल, सचिव विजय अग्रवाल, रतनलाल अग्रवाल, विजय अग्रवाल, आनंद भारुका, ओमप्रकाश अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, तसेच अग्रसेन भवन विश्वस्त मंडळाचे नंदकिशोर पित्ती, राजेश टकसाळी, संदीप गोयल, पुरुषोत्तम अग्रवाल, अग्रवाल महिला समितीच्या उमा अग्रवाल, किरण अग्रवाल, सुनीता अग्रवाल, उषा भारुका, मंगल अग्रवाल, संध्या अग्रवाल, संगीता गुप्ता, अग्रवाल युवा मंचचे आशिष अग्रवाल, शैलेश अग्रवाल, नवनीत भारतीय, गिरीश अग्रवाल, अल्केश अग्रवाल, आलोक अग्रवाल, नीलेश अग्रवाल, अग्रवाल बहू-बेटी मंडळाच्या चेतना अग्रवाल, प्रीती गुप्ता, नेहा अग्रवाल, दीपाली खेतान, निकिता अग्रवाल, लीना अग्रवाल, कीर्ती मल्लावत, जयभगवान गोयल, अॅड. मुकेश गोयंका, सच्चानंद अग्रवाल, राकेशकुमार अग्रवाल तसेच जगदीश अग्रवाल, सुनील सावा, संदीप गुप्ता, किशोर पाडिया, आनंद गजवी, आशिष अग्रवाल, प्रकाश जयपुरिया, मालती गुप्ता, शारदा धानुका आदी समाजबांधवांचा समावेश होता.
हर कोई बोलो, जोरसे बोलो ‘जय अग्रसेन...’
By admin | Updated: September 26, 2014 01:56 IST