शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘‘एसपीए’ही पळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 01:01 IST

देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील शिखर संस्था असलेली ‘आयआयएम’ तीन वर्षांपूर्वी नागपूरला अक्षरश: पळवून नेण्यात आली. मराठवाड्यातील जनतेचा आक्रोश शांत करण्यासाठी शासनाने स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅन्ड आर्किटेक्ट (एसपीए) ही दुसरी मोठी संस्था औरंगाबादला मंजूर करण्यात आली. मागील तीन वर्षांमध्ये ही संस्था उभारण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट आता एसपीए ही नावाजलेली संस्था पुण्याला पळवून नेण्यात आली आहे.मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: औरंगाबादेत एसपीए संस्थेचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला असून, तो मंजूरही झाल्याचे नमूद केले होते. स्थानिक आर्किटेक्ट संघटनेने केंद्रात चौकशी केली असता असा कोणताही प्रस्ताव औरंगाबादसाठी मंजूर केला नसल्याचे समोर आले होते. यासंदर्भात ‘लोकमत’ने ‘औरंगाबादच्या ‘एसपीए’चा प्रस्ताव दिल्लीत पडून’ या मथळ्याखाली १४ डिसेंबर रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना एसपीए ही संस्था पुण्याला आणण्यासंदर्भात पत्र दिल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. स्कूल आॅफ प्लॅनिंगची मागणी औरंगाबादकरांनी केली नव्हती.तीन वर्षांपूर्वी केंद्र शासनाने आयआयएम या संस्थांसाठी विविध शहरांची निवड सुरू केली होती. तेव्हा देशातील सर्वोच्च शिखर संस्था मराठवाड्याच्या राजधानीत यावी म्हणून जनआंदोलन उभे करण्यात आले. शहरातील विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक संस्था, व्यापाºयांनी एकत्र येऊन मोठा लढा उभा केला होता. एवढ्यानंतरही युती शासनाने मराठवाड्यावर अन्याय केला. आयआयएम ही संस्था चक्क नागपूरला पळवून नेण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वत: औरंगाबादला दुय्यम दर्जाची एसपीए ही संस्था मंजूर करण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. नागरिकांनीही एक मोठी संस्था औरंगाबादला येणार असल्याने समाधान व्यक्त केले.मागील तीन वर्षांमध्ये संस्था स्थापन करण्यासाठी कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. उलट औरंगाबादकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम शासनाकडून करण्यात येत आहे. औरंगाबादची एसपीए ही संस्थाही पुण्याला पळविण्यात आली आहे.मुख्यमंत्र्यांची दुटप्पी भूमिकाकेंद्र शासनाने मागील आठवड्यात एसपीए औरंगाबादला मंजूर केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आता स्वत: मुख्यमंत्री ही संस्था पुण्याला स्थापन करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र देतात. ही दुटप्पी भूमिका नाही तर काय म्हणावे, असा संतप्त सवाल स्थानिक आर्किटेक्ट संघटनेचे माजी अध्यक्ष अजय ठाकूर यांनी उपस्थित केला.माझी प्रामाणिक इच्छास्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्कि टेक्ट’ ही संस्था औरंगाबादलाच होणार असून, ही शिखर संस्था पुणे किंवा इतर मोठ्या शहरात हलविण्याबाबत केंद्रासोबत कसलाही पत्रव्यवहार झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकमत’ला बोलताना दिली. ‘स्कूल आॅफ प्लॅनिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्ट’ ही संस्था पुण्याला होणार असल्याच्या बातम्या शनिवारी प्रसिद्ध झाल्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया देताना नमूद केले की, एसपीए ही संस्था औरंगाबादला स्थापन व्हावी, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे.