शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबिन बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण

By admin | Updated: November 15, 2014 23:56 IST

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत.

परभणी : विविध कंपन्यांकडून विकत घेतलेले सोयाबिनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाल्या आहेत. जिल्हाभरातून अशा २१६ तक्रारी दाखल झाल्याने सोयाबिनच्या बियाणांना निकृष्टतेचे ग्रहण लागल्याचीच स्थिती आहे.यावर्षी निसर्गाने अवकृपा केली. त्यामुळे जिल्ह्याची पीकपरिस्थिती अतिशय नाजूक आहे. खरीप आणि रबी असे दोन्ही हंगाम धोक्यात आल्याने पिकांचे थोडेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती लागले नाही. कापूस आणि सोयाबिन ही जिल्ह्यातील मुख्य पिके आहेत. परंतु या दोन्ही पिकांचा उतारा अत्यल्प निघाला. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात गुरफटला आहे. निसर्गाच्या या संकटासमोर हतबल झालेल्या शेतकऱ्यांना मानव निर्मित संकटाचाही सामना करावा लागत आहे.मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांचा सोयाबिनकडे कल वाढला आहे. कापसाकडे पांढरे सोने म्हणून पाहिले जात असले तरी सोयाबिनचे पीक नगदी पिक म्हणून पुढे येत आहे. त्यातूनच सोयाबिनचा पेरा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढला. बहुतांश शेतकऱ्यांचा कल सोयाबिनकडे झाला आहे. सोयाबिनसारख्या पिकातून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन इतर पिकाची कसर या पिकात काढली जाते. त्यामुळे सोयाबिनचे बियाणे घेताना शेतकरी सहसा तडजोड करीत नाही. चांगल्या कंपनीचे बियाणे जास्त पैसे मोजूनही तो खरेदी करतो. यावर्षी सोयाबिनच्या बियाणांचा चांगलाच तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे घरचे बियाणे वापरण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला असला तरी अनेक शेतकऱ्यांनी कंपनीचे बियाणे विकत घेतले. परंतु हे बियाणे मात्र उगवले नसल्याचेच आता समोर येत आहे.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सोयाबिन बियाणे उगवले नसल्याच्या २१६ तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रार करणाऱ्यांच्या सोयाबिन बॅगची संख्या तब्बल ६०४ एवढी आहे. २४१.६ हेक्टरवरील सोयाबिन उगवण शक्ती कमी झाल्याने धोक्यात आले. त्यामुळे जिल्ह्यातील सोयाबिनच्या बियाणांना ग्रहण लागल्याचे चित्र दिसत आहे. गंगाखेड तालुक्यातून सोयाबिन बियाणांविषयी सर्वाधिक ५३ तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. मानवत तालुक्यातील केवळ चार तक्रारी आहेत. जिल्ह्यात सरासरी २ पोत्याचा उतारा सोयाबिनला आला आहे. परंतु या २१६ तक्रारकर्त्यांचे मात्र बियाणेच उगवले नसल्याने उत्पन्नही मिळालेले नाही. त्यामुळे सोयाबिन पिकासाठी केलेल्या खर्चावर पाणी सोडण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. कृषी विभागाने या सर्व तक्रारींचे पंचनामे केले असून, हा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे. परंतु त्यातून शेतकऱ्यांना कितपत मदत मिळते, हाही प्रश्नच आहे.जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती आहे़ त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे़ शेतीतून उत्पन्न मिळाले नसल्याने वर्षभराचे आर्थिक गणित जुळविण्यात गुंतला आहे़ (प्रतिनिधी)