रमेश शिंदे , औसापावसाला तब्बल महिनाभर उशीर झाला़ त्यामुळे पेरण्या विलंबाने होत आहेत़ अजुनही काही शेतकऱ्यांच्या पेरण्या सुरु आहेत़ अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी पेरणी करूनही त्याची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत़ महागामोलाचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ औसा तालुक्यात यावर्षी रोहिण्या, मृग आणि आर्द्रा ही तिनही नक्षत्रे कोरडी गेली़ पुनर्वसु नक्षत्रात तालुक्यात पावसाने हजेरी लावली़ पण तो पाऊसही सर्वसमावेशक झाला नाही, कुठे कमी तर कुठे जास्त पाऊस झाला़ आशीव, उजनी, मातोळा या पट्ट्यात तर पेरण्यालायक पाऊसही झाला नाही़ ज्या भागात पाऊस झाला़ त्या भागातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा होत असल्यामुळे सोयाबीनला पसंती दिली़ यावर्षी तालुक्यात ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाल्याचा अंदाज आहे़ पेरणीपूर्वीच कृषी विभागाने सोयाबीनचे घरगुती बियाणे पेरण्यासाठी जनजागृती केली होती़ त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे तर काहींनी नामांकित कंपनीचे बियाणे वापरले होते़ या नामांकित कंपनीच्या बियाणांनी मात्र शेतकऱ्यांना झोला दिला़ तर काही प्रमाणात घरगुती बियाणेही उगवत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ यावर्षी सोयाबीन बियाणांच्या किंमती अडीच ते तीन हजारापर्यंत आहेत़ पेरणी, खत असा एकूण एका बॅगचा पेरणीचा खर्च ५ हजारच्या जवळपास येत आहे़ आठवडाभराचा कालावधी उलटला असला तरी काही ठिकाणी बियाणे उगवले नाहीत़ उशिरा पाऊस त्यात बियाणे उगवत नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ सोयाबीनची उगवण झाली नसल्याची तक्रार शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे करीत आहेत़ त्यामुळे कृषी सेवा केंद्रचालक त्रस्त झाले आहेत़ महागामोलाचे बियाणे खरेदी करून पेरणी केली़ परंतु, बियाणे उगवत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे़ त्यामुळे आर्थिक समस्येत अडकण्याची भिती व्यक्त होत आहे़ अधीच पेरण्यांना उशीर झाला आहे़ त्यात पुन्हा सोयाबीन उगवत नसल्याच्या तक्रारी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना, अशी अवस्था झाली आहे़ त्यामुळे शेतकरी धास्तावला आहे़ यासंदर्भात पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तक्रारी येत आहेत पण आणखी एक दोन दिवस थांबून आम्ही त्याचे पंचनामे करणार आहोत़ कंपनीचे बियाणे सदोष असले तर कंपन्यांना नुकसानभरपाई द्यावी लागेल, असे सांगितले़ सोयाबीन क्षेत्राची पाहणी़़़खरीप हंगामात सोयाबीन उगवले नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत, असे पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम़डी़ मुक्तापुरे यांनी सांगितले़ तसेच त्यांनी अलमला येथील प्रल्हाद खिचडे यांच्या शेतास भेट देऊन सोयाबीन क्षेत्राची पाहणी केली़ सोयाबीन न उगवल्याने फटकाविठ्ठल कटके ल्ल रेणापूरतालुक्यातील सोयाबीनच्या एकूण क्षेत्रापैकी जवळपास १५ हजार हेक्टर्स क्षेत्रावरील बियाणाची उगवण झाली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांतून येत आहेत़ त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसल्याचा अंदाज व्यक्त होत आहे़रेणापूर तालुक्याचे खरीप पिकाचे ४७ हजार ७०० हेक्टर क्षेत्र आहे़ यावर्षी पाऊस उशिरा झाल्याने खरीपाच्या पेरणीवर झाला़ तालुक्यात जवळपास ९० टक्के पेरण्या पुर्ण झालेल्या आहेत़ महागामोलाचे बीयाणे, खते व इतर औषधांचा वापर करून शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या़ शेतकऱ्यांची सर्व भिस्त सोयाबीनवरच असताना एकूण पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तीस हजार आठशे हेक्टर्स जवळपास पंधरा हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन बीयाणाची उगवणच झालेली नाही, अशा अनेक तक्रारी तालुका कृषी कार्यालयाकडे शेतकरी करीत आहेत़ ज्या शेतकऱ्यांच्या शेतावरील बियाणे उगवलेले नाही अशा शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन तालुका कृषी अधिकारी देवेंद्र जाधव व त्यांचे सहकारी कर्मचारी प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत़ तालुक्यात सोयाबीन- ३० हजार ६३२ हेक्टर्स, तूर- ३ हजार ७०० हेक्टर्स, खरीप -ज्वारी १ हजार ७१४ हेक्टर्स, मका-४३५ हेक्टर्स, मुग ४१३ हेक्टर्स, उडीद १६४ हेक्टर्स, तीळ १०४ हेक्टर्स, भात ८४ हेक्टर्स, बाजरी १६ हेक्टर इतर तृण धान्य ३६ हेक्टर, इतर कड धान्य २५ हेक्टर, भुईमूग २३ हेक्टर, कारळ ३५ हेक्टर, सुर्यफुल ७ हेक्टर, कापूस ४६ हेक्टर, असा एकंदर चाळीस हजार हेक्टर्स क्षेत्रावर पेरा झालेला आहे़यावर्षी बहुतांश शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरव्दारे पेरणी केलेली आहे़ तर महागामोलाचे बीयाणे खरेदी करून पेरण्या केल्या़ पेरणीसाठी शेतकऱ्याला जवळपास सोयाबीन बीयाणे, खते, ट्रॅक्टर भाडे, बीयाणासाठीची औषधे यासाठी हेक्टरी जवळपास अकरा ते बारा हजार रूपयांचा खर्च आलेला आहे़ सोयाबीन बियाणांची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांना बसला असून परत दुबार पेरणी करावी लागणार आहे़
सोयाबीन बियाणे ‘मातीत’
By admin | Updated: July 18, 2014 01:47 IST