शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

भेंडाळा शिवारात उन्हाळी सोयाबीनची पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:05 IST

खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या वेळी बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने ...

खरीप हंगामात सोयाबीन पेरणीच्या वेळी बियाण्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यामुळे आणि ऐन सोयाबीन पीक काढणीच्या वेळी मोठा पाऊस झाल्याने सोयाबीनच्या बियाणे उगवण क्षमतेवर विपरीत परिणाम झाला. त्यामुळे पुढील हंगामात शेतकऱ्यांना मुबलक, उगवणक्षम आणि उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध व्हावे यासाठी कृषी विभागाने रबी व उन्हाळी सोयाबीन पेरणीचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. कृषी विभागाच्या या आवाहानास प्रतिसाद देत कायगाव परिसरातील भेंडाळा, भिवधानोरा, पखोरा, अगरवाडगाव आणि गळनिंब शिवारात सुमारे २२ एकर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली. हे सोयाबीन सध्या वाढीच्या अवस्थेत असून पिकाची योग्य वाढ दिसून येत आहे. यावेळी भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. याप्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहायक श्यामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.

गतवर्षी झाले होते एकरी ७-८ क्विंटल उत्पादन

शेतकऱ्यांना मागील उन्हाळी हंगामात सोयाबीन पेरणीतून एकरी ७-८ क्विंटल एवढे उत्पादन मिळाले होते. किमान हमी भावाची खात्री असल्याने अजूनही काही शेतकऱ्यांचा सोयाबीन पेरणीकडे कल दिसून येत आहे. यामुळे उन्हाळी सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

फोटो :

भेंडाळा शिवारात पेरणी झालेल्या उन्हाळी सोयाबीन पिकाची जिल्हा अधीक्षक तथा कृषी अधिकारी डॉ. टी.एस. मोटे यांनी पाहणी केली. यावेळी शेतकरी हजर होते.

120221\tarekh ahemad usuf shaikh_img-20210209-wa0017_1.jpg

भेंडाळ्याचे शेतकरी विक्रम परभणे, साहेबराव तेलंगे, संतोष सोनवणे, गणेश तेलंगे, कृष्णा तेलंगे, रुस्तुम तेलंगे, अगरवाडगावचे लक्ष्मण वाघ, भिवधानोऱ्याचे सुभाष दुबे, दिलीप दुबे, कायगावचे गणेश गायकवाड, गळनिंबचे ज्ञानेश्वर पाचपुते, किशोर केरे, सुधाकर टेकाळे, मधुकर टेकाळे, अरुण पाचपुते, अनिल पाचपुते, नवनाथ पाचपुते आदी शेतक-यांनी उन्हाळी सोयाबीन पेरणी केली. या प्रसंगी कृषी अधिकारी व्ही. बी. मोरे, मच्छिंद्रनाथ परभणे, कृषी पर्यवेक्षक प्रशांत गोसावी, वैभव घोडके, कृषी सहाय्यक शामकुमार काळे, विनोद पवार, किरण जावळे, विक्रम परभणे, कृष्णा कडू आदी शेतकरी उपस्थित होते.