शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

केवळ १ लाख हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 21, 2014 00:27 IST

विलास चव्हाण, परभणी खरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़

विलास चव्हाण, परभणीखरीप हंगामाची पेरणी जून व जुलै या दोन महिन्यांतच होत असते़ जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यात पावसाने दांडी मारल्याने केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवरच पेरणी झाली आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ गतवर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात पाऊस पडल्याने खरीप हंगामाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पूर्ण झाली होती़ यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे जुलैचा तिसरा आठवडा उलटला तरीही जिल्ह्यातील खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत़ गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या़ परंतु, पाऊस पडत नसल्याने खरिपाच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत़ जिल्ह्यातील जिंतूर, पालम, सेलू आदी तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला प्रारंभ केला आहे़ परभणी तालुक्यात सोयाबीन २ हजार ३३४ हेक्टर, गंगाखेड २ हजार २५० हेक्टर, जिंतूर ५ हजार ४५० हेक्टर, पूर्णा २ हजार ७०० हेक्टर, पालम १५०० हेक्टर, सेलू २ हजार ९७२ हेक्टर, सोनपेठ ४ हजार हेक्टर, मानवत ६ हजार १२० हेक्टरवर पेरणी झाली आहे़ तर कापसाची लागवड परभणी ३ हजार ९१३ हेक्टर, गंगाखेड ३ हजार ७७० हेक्टर, जिंतूर ८ हजार ५०० हेक्टर, पूर्णा ७ हजार ५५० हेक्टर, पालम ६ हजार हेक्टर, सेलू १५ हजार २८० हेक्टर, सोनपेठ ३ हजार ६०० हेक्टर, मानवत ९ हजार ६१३ हेक्टर, पाथरी १ हजार ४२० हेक्टरवर लागवड झाली असून एकूण १ लाख १० हजार ८० हेक्टरवर खरीपाची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे़ ५ लाख ३५ हजार हे़ क्षेत्र प्रस्तावितजिल्ह्याचे खरीप हंगामाचे एकूण क्षेत्र ५ लाख ३५ हजार ७०० हेक्टर प्रस्तावित करण्यात आले आहे़ आजपर्यंत केवळ १ लाख १० हजार ८० हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे़ अद्यापही लाखो हेक्टरवर खरिपाची पेरणी झालीच नाही़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे़ अजून आठ दिवस पाऊस न पडल्यास खरिपाचे पीक जाण्याची शक्यता आहे़ मोठा पाऊसच नाहीजिल्ह्यात आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे़ काही तालुक्यांमध्ये तुरळक पाऊस पडला़ या पावसावरच शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर, कापूस या पिकांची लागवड केली आहे़ परंतु, मोठा पाऊस न पडल्यामुळे ही खरिपाची पिकेही धोक्यात येऊ शकतात़ उडीद व मूग हातचे गेलेमूग व उडीद या पिकाच्या पेरणीचा हंगाम गेल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी टाळली आहे़ त्यामुळे यंदा सर्वसामान्यांना उडीद व मुगाच्या शेंगा बघायला मिळणे अवघड होणार आहे़ मजुरावर उपासमारीची वेळखरिपाच्या पेरण्या खोळंबल्याने शेत मजुरांच्या हाताला काम मिळणे अवघड झाले आहे़ त्यामुळे आपले कुटुंब कसे जगवावे, या विवंचनेत शेतमजूर दिसून येत आहेत़ जिल्ह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस पडला नाही़ शेतकऱ्यांनी धोका पत्करून पेरणी केली आहे़