शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सहा लाख हेक्टरवर पेरा

By admin | Updated: May 27, 2017 00:32 IST

लातूर : मान्सूनपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा मृग नक्षत्राची वाट पाहू लागला असून, यंदा ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मान्सूनपूर्व मशागतीची कामे आटोपून बळीराजा मृग नक्षत्राची वाट पाहू लागला असून, यंदा ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर पेरा होण्याची शक्यता आहे. यंदाही शेतकऱ्यांची पसंती सोयाबीनवरच असून, ४ लाख ६ हजार ८४० हेक्टर्सवर ही पेरणी प्रस्तावित आहे. त्याखालोखाल १ लाख १३ हजार ३८० हेक्टरवर तुरीचा पेरा होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. जिल्ह्यात सर्वसाधारण खरिपाचे क्षेत्र ५ लाख ११ हजार ७८५ हेक्टर्स असून पेरणी मात्र ६ लाख १० हजार ९१ हेक्टरवर प्रस्तावित आहे. खरीप ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख २७ हजार ६५० असले, तरी पेरा मात्र ४५ हजार ५३ हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. तुरीचे सर्वसाधारण क्षेत्र ८१ हजार १४० हेक्टर असून गतवर्षी १ लाख १७ हजार ७४५ हेक्टरवर तुरीची पेरणी झाली होती. यंदा १ लाख १३ हजार ३८० हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. गतवर्षीपेक्षा यंदा तुरीचे क्षेत्र थोडे घटण्याची शक्यता आहे. सोयाबीनही गतवर्षीपेक्षा १५०९ हेक्टरने घटत आहे. तुरीच्या आणि सोयाबीनच्या क्षेत्रावर ऊस लागवड झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. गत हंगामात पाऊसकाळ चांगला झाल्यामुळे ऊस लागवड झाली असल्याचेही कृषी विभागाने म्हटले आहे. उडीद पिकाचे ४४ हजार ६३० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, प्रत्यक्ष पेरा मात्र ११ हजार ८८५ हेक्टरवर होण्याची शक्यता आहे. इतर सूर्यफुल, भुईमूग, साळ, बाजरी, मका, मूग आदी पिकांचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ५ हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरा मात्र ३२ हजार ९३३ हेक्टरवर होईल, असे कृषी विकास अधिकारी भीमराव रणदिवे यांनी सांगितले.