शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यात वंचितांचा आवाज हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:04 IST

समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत देशमुख : मसापतर्फे औरंगाबादेत करण्यात आलेल्या सत्कार सोहळ्यात प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : समीक्षकांच्या लेखी मोठा लेखक होण्यासाठी अभिजन वर्ग केंद्रस्थानी ठेवून कलात्मक लिखाण करण्याऐवजी समाजातील वंचित, शोषित घटकांचा आवाज बनून त्यांचे वास्तव साध्या सोप्या भाषेत सांगणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बडोदा येथे होणाºया ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे रविवारी (दि.११) त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.‘मसाप’च्या सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते देशमुखांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी ‘मसाप’चे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादा गोरे, गणेश मोहिते आणि रामचंद्र काळुंखे उपस्थित होते.‘कलावाद किंवा कलात्मकतेचा विनाकारण अवडंबर माजवू नये. साहित्याने ‘नाही रे’ वर्गाचे प्रतिनिधित्व करावे, अशी अपेक्षा व्यक्त करताना देशमुखांनी मानवी जीवनात साहित्याचे महत्त्व विशद केले. न्या. चपळगावकर यांनी साहित्य संमेलनाच्या उत्सवी स्वरुपावर टीका करताना विचारपीठाची संकल्पना मांडली. अध्यक्षांनी भाषणातून मराठी भाषेच्या स्थितीविषयी आग्रहाने बोलावे. मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत, अशी इच्छादेखील त्यांनी व्यक्त केली.गुणांवर प्रकाशगणेश मोहिते यांनी देशमुखांच्या साहित्याचा आढावा घेताना त्यांच्या कथेच्या गुणवैशिष्ट्यांवर प्रकाश टाकला. ‘कोणत्याही विषयावर संशोधन आणि चिंतन केल्यानंतर जे कथाबीज सापडेल त्यावर दर्जेदार साहित्य निर्माण करणारे देशमुख प्रबोधनाच्या अंगाने लिहितात. उद्याचे जग कसे असेल व असले पाहिजे याविषयी त्यांच्या लिखाणातून प्रतिबिंब उमटते’, असे ते म्हणाले. काळुंखे म्हणाले की, धर्माची चौकट मोडून बाहेर पडणाºया मोजक्या लेखकांमध्ये देशमुखांचा समावेश आहे. देशाच्या सीमा ओलांडून आंतरराष्ट्रीय विषय आणि राजकारण मराठी साहित्यात उतरविण्याचे श्रेय त्यांना जाते.