शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना’; भावाला मेसेज करून तरुणाने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:30 IST

परभणीवरून आल्यानंतर पंढरपूर परिसरात बांधकाम मिस्तरी म्हणून तो काम करीत होता.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने काम मिळणे बंद झाले. परभणी येथील जिवलग मित्र तथा चुलत भाऊ शेख जुबैर याच्या मोबाईलवर संदेश पाठवलाबेरोजगारीमुळे आलेल्या आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या केल्याचा संशय

वाळूज महानगर : ‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पापा का ख्याल रखना, मुझे माफ कर दे’, असा भावनिक संदेश चुलत भाऊ व जिवलग मित्र याला व्हॉटस्अ‍ॅपवर पाठवून ३० वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.१८) पंढरपुरात सकाळी उघडकीस आली. मोहम्मद समीर मोहम्मद जफर असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. 

मोहम्मद समीर मोहम्मद जफर (३०, रा. टीचर कॉलनी, परभणी) हा वर्षभरापूर्वी वाळूज एमआयडीसीत आला होता. परभणी येथील अनेक नातेवाईक पंढरपूर येथे असल्यामुळे त्यांच्या शेजारीच रूम किरायाने घेऊन तो राहत होता. परिसरात बांधकाम मिस्तरी म्हणून तो काम करीत होता. चांगल्या स्वभावामुळे समीरला नवीन काम मिळत गेल्यामुळे कुटुंबीय आनंदात होते. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने काम मिळणे बंद झाले. त्यामुळे तो घरीच राहत होता. अशातच सोमवारी रात्री जेवण करून मो. समीर हा घरात झोपी गेला होता. 

सोमवारी मध्यरात्री ३ वाजून ३ मिनिटांच्या सुमारास मो. समीरने परभणी येथील जिवलग मित्र तथा चुलत भाऊ शेख जुबैर याच्या मोबाईलवर ‘सॉरी, मेरे भाई, मम्मी-पप्पा का ख्याल रखना, मुझे माफ कर दे’, असा संदेश व्हॉटस्अ‍ॅपवर पाठविला. मंगळवारी सकाळी जुबैरने सकाळी मोबाईल बघितला. त्याला मो. समीरचा संदेश दिसला. यानंतर जुबैरने मो. समीरशी संपर्क साधला. मात्र, त्याचा मोबाईल बंद असल्यामुळे जुबैरने समीरसोबत काम करणाऱ्या मित्रांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती दिली. काही वेळानंतर समीरने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर समीर काही दिवस परभणीला गेला होता. तीन आठवडे गावी राहिल्यानंतर तो परत वाळूज एमआयडीसीत आला होता. मात्र, लॉकडाऊनमुळे काम मिळत नसल्याने तो निराश होता. आर्थिक अडचणीमुळे त्याने आत्महत्या केल्याचा संशय मो. समीरचे वडील मो. जफर व  चुलत भाऊ जुबैर यांनी वर्तविला आहे.

पंख्याला घेतला गळफास जुबैरचा फोन आल्यानंतर मो. समीरचे मित्र मो. गौस, मोहसीन शेख हे सकाळी ९ वाजेच्या सुमारास समीरच्या घरी गेले. बराच वेळ समीरच्या घराचा दरवाजा त्यांनी ठोठावला. मात्र, आतून प्रतिसाद येत नसल्याने या मित्रांनी दरवाजा जोरात ढकलून घरात प्रवेश केला. तेव्हा मो. समीर घरातील पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या मित्रांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याला माहिती कळविली. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक विजय घेरडे, पोहेकॉ. सुखदेव भागडे, पोकॉ. शरद वेताळ आदींनी घटनास्थळ गाठून मो. समीरला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषित केले.