महिनाभरापासून वीजपुरवठा खंडित असल्याने केऱ्हाळाचे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. गिरण्याही बंद असल्याने नागरिकांना धान्य दळण्यासाठी इतरत्र जावे लागत होते. याची दखल घेत लोकमतने बुधवारच्या अंकात ‘अपुरा वीजपुरवठा : गिरणीचालकांचे हाल’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत महावितरण कंपनीने बुधवारी दुपारीच तेथे नवीन रोहित्र आणून बसविले. यामुळे नागरिकांनी लोकमतचे आभार मानले.
फोटो बातमीचे कात्रण