शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोनाली, प्रथमेशला तिहेरी मुकुट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:58 IST

विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या के. डी. गादिया स्मृती औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सेनाली मिर्खेलकर आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या दोघांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या १५, १७ व १९ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले.

औरंगाबाद : विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी झालेल्या के. डी. गादिया स्मृती औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेत सेनाली मिर्खेलकर आणि प्रथमेश कुलकर्णी यांनी तिहेरी मुकुट पटकावला. या दोघांनी अनुक्रमे मुली आणि मुलांच्या १५, १७ व १९ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावले.मुलींच्या १५ वर्षांखालील गटात सोनाली मिर्खेलकरने मिताली कुलकर्णी हिच्यावर अंतिम सामन्यात २१-१०, २१-८ अशी मात केली. त्याचप्रमाणे सोनालीने १७ वर्षांखालील अंतिम सामन्यात पूर्वी सेठ हिच्यावर २१-१२, २१-१२ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. सोनालीने १९ वर्षांखालील गटात मिताली कुलकर्णीचा २१-१४, २१-८ असा पराभव करीत तिहेरी मुकुटावर शिक्कामोर्तब केला. महिला गटात नेहा सिकची हिने कोमल चित्तोडकर हिच्यावर १७-२१, २१-१३, २१-१७ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले.मुलांच्या १५ वर्षांखालील गटात प्रथमेश कुलकर्णी याने अंतिम सामन्यात प्रांषू गुमटेचा २१-१६, २१-९ असा पराभव केला. त्यानंतर प्रथमेशने १७ वर्षांखालील गटात मानस पाटीलचे आव्हान २१-१८, २१-१८ व १९ वर्षांखालील गटात कुणाल चामरगोरेचा २१-१५, २१-१७ असा पराभव करीत तिहेरी मुकुटांवर शिक्कामोर्तब केला. पुरुष एकेरीत अर्णव तांबे याने साकेत औटी याच्यावर २१-१६, २१-१७ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले.मुलांच्या १० वर्षांखालील वयोगटाच्या अंतिम सामन्यात सार्थक नलावडेने उदयन देशमुखचा २१-१९, २१-१६ आणि मुलींच्या गटात वेदिका जवळकरने नैनिका रिनगावकरचा १७-२१, २१-१५, २१-१२ असा पराभव करीत विजेतेपद पटकावले. मुलांच्या १३ वर्षांखालील गटात देवांश बडवे याने आदित्य बेंबडे याच्यावर ६-२१, २१-१९, २१-८ अशी मात करीत अजिंक्यपद पटकावले. मुलींच्या गटात सिया बेंबडे हिने संस्कृती सातारकर हिच्यावर २०-२२, २१-१५, २१-१८ अशी मात करीत विजेतेपदाला गवसणी घातली.१५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत आझम खान व सुधांशू शिंदे या जोडीने प्रांषू गुमटे व भार्गवराम पेडगावकरचा २१-१४, १७-२१, २१-१५ असा पराभव केला. १७ वर्षांखालील दुहेरीत आदित्य नेमिवंत व मानस पाटील जोडीने सिद्धार्थ मुथियान व सदानंद महाजन यांचा २३-२१, २१-१९, २१-१० व पुरुष दुहेरीत तेजस चौधरी व साकेत औटी यांनी हिमांशू गोडबोले व अर्णव तांबे यांना २१-१९, २१-१६ असे पराभूत करीत विजेतेपद पटकावले.बक्षीस वितरण पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी औरंगाबाद जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष शिरीष बोराळकर, सचिव सिद्धार्थ पाटील, राहुल देशमुख, शुभांगी जोशी, परीक्षित पाटील, नरेश गुंडले, सत्यबोध टंकसाली, हर्षा देशपांडे, भक्ती मोदाळे, वीरेंद्र पाटील, नितीन इंगोले, मिलिंद देशमुख, प्रभू रापतवार, ऋतुपर्ण कुलकर्णी, जावेद पठाण, हिमांशू गोडबोले आदी उपस्थित होते.

टॅग्स :BadmintonBadminton