शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजित पवार, शेतकऱ्यांनी जीवन संपवावे असे वाटते का तुम्हाला?”; प्रकाश आंबेडकरांचा सवाल
2
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
3
‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका
4
Crime: कुटुंबासाठी काळ ठरला नवरा; बायको मुलीसह नातेवाईकाचा विळ्याने चिरला गळा, कारण काय?
5
तुमच्या बचतीवर बक्कळ नफा! ही घ्या ३ वर्षांच्या FD वर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी
6
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
7
पत्नीला द्यायचं होतं सरप्राइज, पानवाल्याने जमवली १ लाखाची नाणी, सोनाराकडे गेला, त्यानंतर...   
8
Video - अडीच वर्षांचा मुलगा खेळताना आली स्कूल व्हॅन अन्...; काळजात चर्र करणारी घटना
9
तुमच्या जुन्या बँक खात्यात पैसे विसरलात का? RBI ने सांगितला फक्त ३ स्टेप्सचा सोपा मार्ग
10
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
11
नात्याला काळीमा ! दीराने वहिनीचे दोन्ही हात पकडून ठेवले अन् पतीने कापला गळा...
12
AUS vs IND 3rd T20I : संजू संघातून ‘आउट’; टॉसवेळी सूर्याचं मिचेल मार्शसमोर भन्नाट सेलिब्रेशन!
13
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
14
'ट्रॅजेडी क्वीन' मीना कुमारीवर बायोपिक येणार, क्रिती सेननचा पत्ता कट; 'ही' अभिनेत्री फायनल?
15
भाग्यवान! ११ वर्षांच्या मुलाचं अचानक 'असं' फळफळलं नशीब, रातोरात झाला करोडपती
16
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
17
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
18
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
19
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
20
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी

सून जेवण देत नाही, मुलगा काही बोलत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:26 IST

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र मुलगा आणि सून ...

मुलगा आणि सुनेचे घरातील ज्येष्ठ नागरिकांशी न पटणे, ही समस्या आज अनेक घरांमध्ये दिसून येते. मात्र मुलगा आणि सून दोघेही कामानिमित्त घराबाहेर गेले की त्यांना त्यांचे स्वातंत्र्य मिळते आणि ज्येष्ठांना घरात मुक्त श्वास घेता येतो. परंतु लॉकडाऊनदरम्यान सगळे घरीच असल्यामुळे भांड्याला अधिकच जोरात भांडे लागू लागले आणि घरातील भांडणे विकोपाला जाऊ लागली. याचीच परिणीती म्हणून पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षात येणाऱ्या तक्रारी वाढल्याचे दिसते.

संवाद खुंटणे आणि एकमेकांना समजून न घेणे, हेच या सगळ्या तक्रारींचे मुळ आहे. आज महिला ज्याप्रमाणे त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक झाल्या आहेत, त्याचप्रकारची ज्येष्ठ नागरिक कायद्याबाबतची जागरूकता ज्येष्ठांमध्ये आली आहे.

चौकट :

कुटुंबीयांकडून दुर्लक्ष

१. आपण म्हातारे झालो, म्हणजे आता कुटुंबीयांसाठी निरूपयोगी ठरतो आहोत, ही भावना ज्येष्ठांच्या मनात बळावत आहे.

२. कामाचा ताण, सोशल मीडियामुळे स्वत:भोवती निर्माण झालेले आभासी जग यामुळे तरूणाईला आपल्या सभोवतालच्या माणसांचा विसर पडतो. यातूनच संवाद खुंटतो आणि दोन पिढ्यांमध्ये अंतर निर्माण होते.

३. पोलीस आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक कक्षामध्ये फोनद्वारे तक्रारी येण्याचे प्रमाण अधिक आहे. मात्र लेखी स्वरूपात तक्रार देणाऱ्यांचे प्रमाण कमी आहे.

४. तक्रार आल्यानंतर जेव्हा समुपदेशनासाठी बोलविले जाते, तेव्हा मुलगा, सून यांच्याकडून टाळाटाळ केली जाते.

५. मुलाने घर बळकावले, माझ्याच घरातून मला बाहेर काढले, आम्हीच आमच्या घरात परके झालो आहोत, सून आमच्याशी बोलत नाही, सून आमचा राग- राग करते, नातवंडांना आमच्यापासून दूर करते, अशा स्वरूपाच्या तक्रारी घेऊन येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे.

चौकट :

ज्येष्ठांना समजून घ्या

सून विचारत नाही, औषधी आणून देत नाही, घरात आमच्याशी कुणी बोलत नाही, अशा ज्येष्ठांकडून येणाऱ्या तक्रारी अगदीच कौटुंबिक स्वरूपाच्या असतात. बऱ्याचदा एकमेकांमध्ये कमी होत चाललेला संवाद हेच या तक्रारींचे खरे कारण असते. वृद्धांकडूनही काही चुका होत असतील, पण तरूणांनी त्यांच्या वयाचे भान ठेवून त्यांच्याशी सामंजस्याने वागणे गरजेचे आहे. ज्येष्ठांच्या भावनांना समजून घेतले तर बहुतांश घरातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या दूर होतील

- किरण पाटील

पोलीस निरीक्षक

चौकट :

तक्रारींचे प्रमाण

महिना... फोनद्वारे येणाऱ्या तक्रारी... लेखी तक्रारी

एप्रिल ... ५.... ३

मे .... ५.... ३

जून... २०.... ४

जूलै .... १४..... ४

ऑगस्ट .... १० .... ४

सप्टेंबर .... १०.... ३

ऑक्टोबर .... ८ .... ४