बीड : जिल्ह्यातील सहा नगर पालिकांतील नगर सेवक पदाचे आरक्षणाची ‘ड्रॉ’ पध्दतीने शनिवारी सोडत झाली. बहुतांश वॉर्डांमध्ये प्रवर्ग बदलून आरक्षण पडले. झालेल्या प्रभाग निहाय आरक्षण सोडतीने ‘कही खुशी कही गम’ असे चित्र सहा पालिकांमधील प्रभागांमध्ये पहावयास मिळत आहे.बीडसह गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई, धारूर या सहा ठिकाणच्या नगर पालिकांमधील नगर सेवकांच्या आरक्षणांची सोडत झाली. २०११ च्या जनगननेनुसार आरक्षणाची सोडत झाली आहे. विशेष म्हणजे मागील पाचवर्षाच्या तुलनेत लोकसंख्या वाढल्याने वॉर्ड देखील वाढले आहेत. शनिवारी सकाळी १० वाजल्यापासूनच सर्व नगर पालिकांमध्ये ड्रा पध्दतीने लहान मुलाच्या हास्ते चिठ्ठी काढून पारदर्शकपणे आरक्षण सोडत झाली. नेते-कार्यकर्ते ठिय्या मांडूनआरक्षण सोडत असलेल्या ठिकाणी सकाळी नऊ वाजल्यापासूनच वेगवेगळ्या पक्षाचे पालिकेतील नेते व कार्यकर्ते आरक्षण कुठल्या प्रवर्गासाठी सुटते हे पहाण्यासाठी गर्दी करत होते. संबंधीत अधिकारी ध्वनी क्षेपकांरून आरक्षण जाहीर करताच या आरक्षणाचा आपल्या वॉर्डात कोणाला फायदा व कोणाला तोटा याचा हिशोब लावत असल्याचे चित्र बीड, अंबाजोगाई, धारूर, माजलगाव व परळी येथे पहावयास मिळाले.आता बायकोच्या जागेवर निवडणूक लढवणार नवरोबागत पंचवार्षीक नगर पालिका प्रभागात महिलेसाठी असलेले आरक्षण बदलून यावेळी पुरूषासाठी राखीव सुटले आहे. अशा काही प्रभागांमध्ये बायकोच्या जागेवर त्या महिलेचा नवरा नगर पालिकेच्या निवडणूकीत उतरणार आहे.धारूरमध्ये आठ प्रभागधारूरमध्ये प्रभाग क्र .१ मधील अ - ओबीसी पुरूष तर ब मध्ये सर्वसाधारण महिला, क्र . २ - अनुसूचित महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ३ - ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ४ अ - सर्वसाधारण महिला ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ५ - ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ६ - सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ७ अ - ओबीसी पुरूष तर ब सर्वसाधारण महिला, क्र . ८ अ अनुसूचित पुरूष तर ब ओबीसी महिला तर क सर्वसाधारण महिला अशा पध्दतीने आरक्षणाची सोडत झाली.परळीत १६ प्रभागपरळीत प्रभाग क्र .१ मधील अ - अनुसूचित पुरूष तर ब मध्ये सर्वसाधारण महिला, क्र . २ - ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ३ - अनुसूचित महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ४ अ - ओबीसी महिला ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ५ - ओबीसी पुरूष तर ब सर्वसाधारण महिला, क्र . ६ - ओबीसी महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ७ अ - ओबीसी पुरूष तर ब सर्वसाधारण महिला, क्र . ८ अ अनुसूचित महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ९ - ओबीसी महिला तर ब ओबीसी महिला तर क सर्वसाधारण महिला, क्र . १० - अनुसूचित महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . ११ अ - ओबीसी महिला ब सर्वसाधारण पुरूष, क्र . १२ - अनुसूचित महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . १३ - ओबीसी पुरूष तर ब सर्वसाधारण महिला, क्र . १४ अ - सर्वसारधारण महिला तर ब सर्वसाधारण पुरूष, क्र . १५ अ ओबीसी पुरूष तर ब सर्वसाधारण महिला, क्र. १६ अ सर्वसाधारण महिला तर ब सर्वसाधारण पुरूष अशी आरक्षण सोडत काढण्यात आली.गेवराईत ९ प्रभागांची सोडतगेवराईत प्रभाग क्र. १ अ ना.मा.प्र.ओ.बी.सी पुरूष तर ब स.सा.महिला, क्र. २ अ स.सा.महिला तर ब स.सा. महिला, तर क स.सा. पुरूष, क्र. ३ अ ना.मा.प्र.ओबीसी महिला, तर ब स.सा.पुरूष, क्र. ४ अ ए.सी. महिला, तर ब स.सा.पुरूष, क्र. ५ अ ना.मा.प्र.ओबीसी पुरूष तर ब स.सा. पुरूष, क्र. ६ अ ना.मा.प्र. ओबीसी तर ब स.सा.पुरूष, क्र. ७ अ ना.मा.प्र.ओबीसी महिला तर ब स.सा.पुरूष, क़ ८ अ एसी पुरूष तर ब स.सा.महिला तसेच प्रभाग क्र. ९ अ स.सा.महिला तर ब स.सा. पुरूष असे आरक्षण काढण्यात आले. यावेळी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)रवींद्र क्षीरसागर ठाण मांडून४गजानन कारखान्याचे चेअरमन रवींद्र क्षीरसागर हे बीड पालिकेच्या राजकारणापासून आतापर्यंत अलिप्त होते. आरक्षण सोडतीवेळी शनिवारी ते पालिकेत ठाण मांडून होते. त्यांच्या उपस्थितीने बदलत्या राजकीय समीकरणावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. बीड नगर परिषदेत एकूण चोवीस प्रभाग असून, सदस्य संख्या ५० आहे. अनुसूचित जातीसाठी सहा, अनुसूचित जातीसाठी राखीव ६, नागरिकांचा मागास प्रवर्ग १४, तर सर्वसाधारण सदस्यांसाठी ३० ठिकाणी आरक्षण सुटले आहे. ५० टक्के आरक्षणाचा नियम लागू करीत ५० पैकी बीड नगरपालिकेत २५ जागा महिलांसाठी जागा आहेत. १५ बाय १५ आकाराच्या कागदी चिठ्ठ्या करून त्या काचेच्या भांड्यात टाकून एका लहान मुलाच्या हस्ते काढून सोडत काढण्यात आली. यामध्ये मागास प्रवर्गासाठी असलेल्या १४ जागांची सोडत काढली.माजलगावात प्रभाग क्र .१ मधील अ साठी ओबीसी महिला राखीव तर ब मध्ये नागरिकांचा खुला, क्र . २ अ अनुसूचित जाती महिला राखीव तर ब महिलासाठी राखीव, क्र . ३ अ महिलासाठी राखीव तर ब सर्वसाधारण, क्र . ४ अ महिलासाठी राखीव तर ब सर्वसाधारण खुला, क्र . ५ अ ओबीसी खुला वर्ग तर ब सर्वसाधारण खुला प्रगर्व, प्रभाग क्र . ७ अ अनुसूचित जाती महिला राखीव तर ब सर्वसाधारण खुला प्रवर्ग, क्र . ८ अ ओबीसी महिला राखीव तर ब सर्वसाधारण खुला प्रवर्ग, क्र . ९ अ महिला राखीव तर ब सर्वसाधारण खुला प्रवर्ग, क्र . १० अ महिला राखीव तर ब ओबीसी खुला प्रवर्ग, क्र . ११ अ महिला राखीव तर ब सर्वसाधारण खुला प्रवर्ग, तर प्रभाग क्र.१२ अ अनुसूचित जाती महिला तर ब खुला प्रवर्ग सर्वसाधारण अशा पध्दतीने आरक्षणाची सोडत झाली.
‘कहीं खुशी, कहीं गम’ !
By admin | Updated: July 3, 2016 00:43 IST