शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाच्या विळख्यातून स्वत:ला सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 00:59 IST

सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सोशल मीडियाचा विळखा प्रत्येकाला पडला आहे. या विळख्यामुळे स्नानाच्या अगोदरचे विधी, जेवण, कार्यालयीन वेळ, मुलांना द्यायचा वेळ, कुटुंबाच्या वेळेपासून प्रत्येक जण दूर जात आहे. याचा परिणाम समाज धोकादायक वळणावर उभा आहे. यातून प्रत्येकाने स्वत:ला सोडवून घेण्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा परिणामांना सामोरे जावे लागेल, असे आवाहन इंटरनॅशनल स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांनी केले.जैन टॅग ग्रुपतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यगृहात आंतरराष्ट्रीय स्पिकर डॉ. उज्ज्वल पाटणी यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. पाटणी यांनी ‘यू लिव्ह ओन्ली वन्स’ या विषयावर मार्गदर्शन केले. सुरुवातीला खंडेलवाल दिगंबर जैन मंदिराचे अध्यक्ष ललित पाटणी, मनीषा भन्साली, सोनाली पाटणी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करण्यात आले.यानंतर बोलताना डॉ. पाटणी म्हणाले, जीवनामध्ये आनंदी, सुखी, संपन्न राहण्यासाठी प्रत्येकाला भाषा व्यवस्थित वापरली पाहिजे. भाषा वापरताना त्यात जीव असला पाहिजे. त्याशिवाय प्रत्येक गोष्टीत आनंद मिळत नाही. याचबरोबर प्रत्येक जण आपल्या पाल्यांवर प्रेम करतात. मात्र त्यांच्यासाठी वेळ देण्यासाठी मागेपुढे पाहिले जाते, असे होऊ नये. कारण उद्या तेच पाल्य आपल्याला वेळ देणार नाहीत. या वेळेच्या बाबतीत सध्या सोशल मीडिया प्रत्येक व्यक्तीची मालक बनली आहे. मानवाने तंत्रज्ञान निर्माण केले. या तंत्रज्ञानाच्या मदतीने सहकार्य होणे अपेक्षित होते. मात्र उलटेच घडले. आज तंत्रज्ञानाच्या आहारी मनुष्य गेला आहे. यात माणूस गुलाम आणि तंत्रज्ञान मालक, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सोशल मीडियात व्हॉटस्अ‍ॅपवर साधा मेसेज पडताच आपण त्याला तात्काळ रिप्लाय देतो. आपल्याकडे यासाठी भरपूर वेळ असतो. मात्र कुटुंब, मुलं, कार्यालयीन काम याकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत. या मोबाईलच्या गुलामीपासून मुक्त व्हा, मोठे होण्यासाठी सोशल मीडिया सोडावाच लागेल, असेही डॉ. पाटणी यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे मंगलचरण जयश्री लोहाडे यांनी म्हटले. श्वेता कासलीवाल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्वेता गंगवाल यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन टॅग ग्रुपच्या अध्यक्षा अनुपमा दगडा, उपाध्यक्षा दीपिका बडजाते, सचिव श्वेता सेठी, स्वाती कासलीवाल, प्रकल्पप्रमुख श्वेता कासलीवाल, पूजा झांझरी, श्वेता गंगवाल, जयश्री लोहाडे, सदस्या रिचा कासलीवाल, रिना ठोले, मोनिका चांदीवाल यांच्यासह इतरांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सभागृह खचाखच भरलेले होते.