निवेदन देताना तालुकाध्यक्ष बबनराव बनसोड, शहराध्यक्ष अहेमदअली, रत्नाकर पंडित, नगरसेवक प्रकाश गाडेकर, पुंडलिक राठोड, कचरू जैस्वाल, सुदाम राठोड आदी उपस्थित होते. मका खरेदी केंद्राचे उद्घाटन फक्त नावालाच झाले असून, बारदाना नसल्याने आतापर्यंत मक्याचा दाणाही खरेदी झालेला नाही, असा आरोप संतोष कोल्हे यांनी केला आहे. बाजूच्या तालुक्यात कापूस खरेदी सुरू झाली आहे. मात्र, कन्नडला खरेदी सुरू झालेली नाही. यामागे शासनाला बदनाम करण्याचा हेतू प्रशासनाकडून केला जात आहे का? असा प्रश्न विचारत प्रशासनावर संशय व्यक्त केला आहे.
फोटो ओळ -
अव्वल कारकून विनायकराव अकोलकर यांना निवेदन देताना राष्ट्रवादीचे संतोष कोल्हे, बबनराव बनसोड, अहमदअली, रत्नाकर पंडित आदी.