शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

अधीक्षक कार्यालयात निवृत्त फौजदारास भोवळ

By admin | Updated: February 27, 2017 00:41 IST

बीड : मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणुन दररोज हेलपाटे मारूनही प्रशासन दखल घेत नसल्याने मुलाच्या माता-पित्याने रविवारी सकाळी अधीक्षक कार्यालय गाठले.

बीड : मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणुन दररोज हेलपाटे मारूनही प्रशासन दखल घेत नसल्याने मुलाच्या माता-पित्याने रविवारी सकाळी अधीक्षक कार्यालय गाठले. दीर्घ प्रतिक्षेनंतरही कुणीच दखल न घेतल्याने मुलाचे वडील बेशुद्ध होऊन कोसळले. विशेष म्हणजे ते निवृत्त सहायक फौजदार आहेत. शेख नखीम असे त्यांचे नाव असून, त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मुलगा शेख अलीम याचा ३ मे २०१६ रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी शेख नखीम व त्यांची पत्नी खैसर बेगम करत आहेत. सातत्याने शहर ठाण्यात हेलपाटे मारूनही दखल घेतली जात नसल्याने शेख दाम्पत्य अधीक्षकांच्या भेटीला आले होते. अधीक्षक जी. श्रीधर कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनाबाहेर शेख दांपत्य ताटकळत थांबले होते. दोन तासानंतर शेख नखीम हे बेशुद्ध पडले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना झोळीतून जिल्हा रुग्णालयात हलविले. उप अधीक्षक गणेश गावडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या संदर्भात योग्य ती चौकशी केली जाईल, असे गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तशा सूचना शहर ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)