हिंगोली : ‘सौर अभ्यासिकेला मुहूर्त कधी?’ या शिर्षकाखाली रविवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच कृषी विभागाला खडबडून जाग आली. लोकवाट्याचा विचार न करता तातडीने १४८ गावांत सौर दिव्यांचे वाटप केले गेले. मागील ३ वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली अभ्यासिका सुरू झाल्याने अनेक गावे उजळून निघाली. ग्रामीण भागात १० तासापेक्षा अधिकच्या भारनियमनामुळे रात्ररात्र अंधरात काढावी लागते. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्यामुळे शाश्वत ऊर्जेसाठी सौर अभ्यासिका सुरू करण्याचे प्रयोजन होते. पुढे हिंगोली आणि सेनगाव तालुक्यातील १७६ गावांची निवड केली होती. सौरदिवेही कृषी कार्यालयात आले होते; परंतु ते अद्याप वाटप करण्यात आलेले नाहीत. ग्रामपंचायतीच्या लोकवाट्याअभावी हे दिवे धूळ खात पडून असल्याचे ‘लोकमत’ने उघड केले. तेव्हा कृषी विभाग खडबडून जाग आली. अवघ्या दोन दिवसांत यंत्रणा कामाला लागली. लोकवाट्याचा विचार न करता १४८ गावांत दिवे वाटप करता आले. उर्वरित दिवे लवकर वाटप करण्यात येणार आहेत. त्यांतर लोकवाटा ग्रामपंचायतीकडून जमा केला जाणार आहे. गत तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या हा प्रश्न सुटल्याने अनेक गावांत आनंद व्यक्त होत आहे. प्राधान्याने शाळेत हे दिवे बसविण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
सौर अभ्यासिकेला मुहूर्त लागला
By admin | Updated: October 13, 2014 23:33 IST