लोहारा : उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकच डबघाईला आल्याने ग्रामीण भागातील विकासे सोसायट्याही डबघाईस आल्या असून या संस्थांचे व्यवहार कागदोपत्रीच सुरू असल्याचे दिसून येत आहे. लोहारा तालुक्यात ४७ गावे असून, यासाठीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांची संख्या ४० आहे. या ४० विकासे सोसायट्यांचा कारभार केवळ ८ गटसचिवांवर सुरू असून, जिल्हा बँक डबघाईला आल्याने कर्जदार कर्ज भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे सुरळीत सुरू असलेल्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्याही अडचणीत आल्या आहेत. तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांमध्ये कागदोपत्री पैसे आले. आणि पैसे वाटप करणे, असे नवे-जुने केले जात आहे. एक लाखापर्यंत शुन्य टक्के व्याज दराने कर्ज दिले जात असल्यामुळे चालू बाकीदारांना व्याज लागत नाही. त्यामुळे चालू थकबाकीदार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याचे व पैसे वाटप केल्याचे कागदोपत्री दाखविले जात आहे. जे थकबाकीदार आहेत ते थकबाकीदारच राहत आहेत. त्यात राष्ट्रीयकृत बँका या शेतकऱ्यांना पीक कर्जे वाटप करीत असल्याने सोसायटीकडे दुर्लक्ष झाले आहे. (वार्ताहर)
लोहारा तालुक्यातील सोसायट्या डबघाईस
By admin | Updated: September 25, 2014 00:53 IST