शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जि.प.च्या अर्थसंकल्पात समाजकल्याण निधीला कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 00:12 IST

जिल्हा परिषदेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी मंजूर झाला. तथापि, अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागाच्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावण्यात आली. याबद्दल अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करून समाजकल्याण विभागाच्या योजनांसाठी निधी वाढवून द्यायचा नसेल तर नका देऊ; परंतु किमान मागच्या वर्षी जेवढा होता तेवढा तरी ठेवा, असा आग्रह धरला आहे.

ठळक मुद्देसदस्यांमध्ये नाराजी : सभापती धनराज बेडवाल देणार पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : जिल्हा परिषदेचा २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प बुधवारी मंजूर झाला. तथापि, अर्थसंकल्पात समाजकल्याण विभागाच्या अनेक योजनांच्या निधीला कात्री लावण्यात आली. याबद्दल अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त करून समाजकल्याण विभागाच्या योजनांसाठी निधी वाढवून द्यायचा नसेल तर नका देऊ; परंतु किमान मागच्या वर्षी जेवढा होता तेवढा तरी ठेवा, असा आग्रह धरला आहे.यासंदर्भात जि. प. सदस्य रमेश गायकवाड म्हणाले की, मागच्या वर्षात (२०१७-१८) मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सायकल योजनेसाठी २५ लाख रुपयांची तरतूद होती. यंदाच्या बजेटमध्ये यासाठी तरतूदच ठेवण्यात आलेली नाही.मागासवर्गीय शेतकऱ्यांना औषध फवारणीसाठी स्प्रेपंप, आॅईल इंजिन, पीव्हीसी पाईप, मागासवर्गीय महिलांना झेरॉक्स मशीन, पीठाची गिरणी, टीनपत्रे, ताडपत्री, संगणक, पिको फॉल, दलित वस्तींना ग्रंथालय, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘टॅब’ आदींसाठी तरतूदच नाही. दुसरीकडे, समाजकल्याण आयुक्तालयाकडून कार्यालयीन प्रशासकीय कामकाजासाठी तरतूद केली जाते. असे असताना जिल्हा परिषदेने यासाठी स्वतंत्र तरतूद करण्याची गरजच नव्हती.कृषी विभागाने शेतकरी मार्गदर्शन शिबिरांसाठी गेल्या वर्षी ५ लाख रुपयांची तरतूद केली होती. यंदा १२ लाख रुपयांची तरतूद असली तरी ती पुरेशी नाही. यामध्ये परिसंवाद, चर्चासत्रासाठी किमान २५ लाख रुपयांची तरतूद सुचविण्यात आली आहे. शेतकºयांना दुधाळ गायी पुरविण्यासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामध्ये वाढ करून ती दीड कोटी रुपये करावी, मुक्त संचार गोठ्यासाठी ३० लाखांची तरतूद आहे, ती २ कोटी करावी, अशा शिफारशी गायकवाड यांनी केल्या आहेत.किशोर बलांडे, अविनाश गलांडे व अन्य सदस्यांनीही समाजकल्याण योजनांच्या तरतुदीमध्ये कपात न करण्याचा आग्रह धरला आहे.सभापतींचाही विरोधयासंदर्भात समाजकल्याण सभापती धनराज बेडवाल म्हणाले की, समाजकल्याण विभागाच्या अनेक योजनांना यंदा कात्री लावण्यात आली आहे. ही बाब आपणास मान्य नाही. यासंदर्भात आपण अर्थ समितीचे सभापती, जि. प. अध्यक्षा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांना पत्र देणार असल्याचे ते म्हणाले.सभागृहात बजेट सादर होण्यापूर्वी ते सदस्यांना अवलोकनार्थ दिले जाते. समाजकल्याण सभापती बेडवाल यांना निधी कपात करण्यात आल्याची बाब मान्य नाही, मग त्यांनी अगोदर बजेटचा अभ्यास केलेला नव्हता काय, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.