शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

नाटकांमधून दिला सामाजिक संदेश

By admin | Updated: April 18, 2016 00:55 IST

औरंगाबाद : महावीर जयंतीनिमित्त सध्या शहरातील जैन समाजबांधवांकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत.

औरंगाबाद : महावीर जयंतीनिमित्त सध्या शहरातील जैन समाजबांधवांकडून विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जात आहेत. भगवान महावीर जन्मकल्याणक समिती-२०१६ द्वारे या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये रविवारी महिलांसाठी नाटक स्पर्धा घेण्यात आल्या. या नाटकांद्वारे महिलांनी सामाजिक प्रश्न हाताळून त्यावर प्रभावी भाष्य केले. नीलिमा ठोळे यांच्या ‘स्त्रीभ्रूणहत्या’विषयक एकपात्री प्रयोगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. निकिता साहुजी यांनी रंगवलेली प्रखर आणि तेजस्वी ‘झांशीची राणी’ प्रेक्षकांना विशेष आवडून गेली. मैत्री बहुमंडळाने सादर केलेल्या नाटिकातून प्रेक्षकांना परिसर आणि पर्यायाने संपूर्ण देशच स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा, वृषभ कासलीवाल, विनोद बोकडिया, भारती बागरेचा, मुकेश साहुजी, मिठालाल क ांकरिया, अनिलकुमार संचेती, विकास रायमाने, संतोष पापडीवाल, राजेश मुथा, नीलेश सावलकर, संजय सुराणा, नीलेश पहाडे, सुनील वायकोस, करुणा साहुजी, आदींची उपस्थिती होती. महावीर जयंतीनिमित्त विविध उपक्रमाला प्रतिसादऔरंगाबाद : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीअंतर्गत महिला मंडळाच्या वतीने विविध उपक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रश्नावली स्पर्धा, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनविणे व धार्मिक संस्कार शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळातर्फे सराफा बाजार येथील जैन मंदिरात प्रश्नावली स्पर्धा घेण्यात आली. यात १७० महिलांनी सहभाग घेतला. यात धार्मिक, दिमाख की बत्ती जलाओ, पहेलिया, महापुरुषांच्या मातांची नावे, चिन्हावरून तीर्थंकारांची नावे लिहिणे आदींचा समावेश होता. स्पर्धेसाठी नंदा साहुजी, रिता साहुजी, सुषमा साहुजी, वर्षा साहुजी, सुनीता साहुजी, नंदा साहुजी, सारिका साहुजी, सुनंदा साहुजी, ज्योती साहुजी, अर्चना साहुजी, पद्मा साहुजी, उषा साहुजी, स्वाती साहुजी, प्रिया साहुजी, चित्रा साहुजी, पूजा साहुजी आदींनी परिश्रम घेतले. कल्पकतेचा कलाविष्कार अग्रवाल दिगंबर जैन महिला मंडळातर्फे आयोजित स्पर्धेत महिला व तरुणींनी टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करून कल्पकतेचा कलाविष्कार दाखविला. यात दृष्टी बदलल्यास सृष्टी बदलता येते याप्रमाणे निरुपयोगी वस्तूंपासून सुबक, आकर्षक, विविध आकार, रंगसंगती यापासून कागद, बिया, बाटल्या, पेन, ग्लास, सी. डी. पेपर, टी-शर्ट, बांगड्या, नारळ आदींपासून तबला, पाळणा, आकाशकंदिल, टेबल लॅम्प, विद्युत माळ, फ्रेम, आकर्षक दिवा आदी वस्तू स्पर्धकांनी बनविल्या. परीक्षक म्हणून डॉ. निर्मला मुथा, पल्लवी शहा, पूजा साहुजी यांनी काम पाहिले. यावेळी महोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, महिला मंडळाच्या सदस्या व कमला ओस्तवाल, मंजू पाटणी, मीना पापडीवाल, शारदा लोहाडे आदींची उपस्थिती होती. धार्मिक संस्कार शिबीर औरंगाबाद : भगवान महावीर जन्मोत्सवानिमित्त अहिंसानगर येथे धार्मिक संस्कार शिबीर घेण्यात आले. यात ७० जणांनी सहभाग घेतला.लहान मुलांना शालेय शिक्षणाबरोबरच धार्मिक शिक्षणसुद्धा मिळावे या हेतूने अहिंसानगर बहुमंडळाच्या वतीने ११ ते १५ एप्रिलदरम्यान शिबीर घेण्यात आले. यात ३ ते १८ वयोगटातील मुला-मुली सहभागी झाल्या होत्या. शिबिराच्या सांगताप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव समितीचे अध्यक्ष मदनलाल आच्छा, मिठालाल कांकरिया, विमलराणी बाफना, राखी देसरडा, भगवानदास शिसोदिया, बहुमंडळाच्या अध्यक्षा रुपाली चोरडिया यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले. यावेळी जैन धर्माची माहिती असलेल्या माहितीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. शिबीर यशस्वीतेसाठी सुषमा शिसोदिया, तृप्ती बोरुदिया, रुपाली जैन, कविता जैन, रश्मी मुथा, मोना गांधी आदींनी परिश्रम घेतले.