शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प., पं.स.साठी आतापर्यंत ९७ अर्ज दाखल

By admin | Updated: January 31, 2017 00:20 IST

बीड :आतापर्यंत गटंसाठी ४७, गणांसाठी ५० अर्ज आले आहेत.

बीड : जिल्हा परिषदेच्या ६० गटासाठी व १२० पंचायत समिती गणासाठी आगामी १६ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून आॅनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला. आतापर्यंत गटंसाठी ४७, गणांसाठी ५० अर्ज आले आहेत. सोमवारी दिवसभरात ९३ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवशी एकाही इच्छूकाने अर्ज दाखल केले नव्हते. रविवारी जिल्हा परिषद गटासाठी १ तर पंचायत समिती गणासाठी ३ असे एकूण ४ अर्जांची नोंद झाली. सोमवारी इच्छूकांनी आपले अर्ज भरण्यास गर्दी केली. दिवसभरात जिल्हा परिषद गटांसाठी ४६ तर पंचायत समिती गणांसाठी ४७ असे एकूण ९३ अर्ज दाखल केले. दरम्यान, दोन दिवसांमध्ये एकूण ९७ अर्ज दाखल झाले असून बुधवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान गेवराई तालुक्यातून सर्वाधिक ३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून याखालोखाल बीड तालुक्यातून १९ अर्ज दाखल झाले आहेत तर पाटोदा तालुक्यातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.बीड तालुक्यात मातब्बर रिंगणातबीड तालुक्यात आतापर्यंत ११ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ११ तर पंचायत समितीसाठी ८ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, नाळवंडी गटासाठी राष्ट्रवादीकडून अरूण डाके तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय बहीरवाडी गटातून शिवसेनेच्या नवनाथ प्रभाळे यांनी तीन अर्ज दाखल केले असून पाली गटातून राष्ट्रवादीच्या उषा विश्वास आखाडे यांनी दोन अर्ज तर सुरेखा लिंबाजी घुगे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. नवगण राजुरी गटातून शेकापकडून गणेश भाऊसाहेब कोळेकर यांनी दावेदारी दाखल केली आहे. याशिवाय पंचायत समिती गणासाठी घोडका राजुरी गणातून उमीर्ला लांडे, कामखेडा गणातून शेकापच्या उर्मिला ज्ञानेश्वर काशीद, नाळवंडी गणातून शिवसेनेचे प्रल्हाद कांबळे, मांजरसुंबा गणातून भाजपच्या प्रतिभा कैलास गणगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)