सितम सोनवणे , लातूरश्रावण शुध्द पंचमीला ‘नागपंचमी’असे संबोधले जाते़ या दिवशी जिवंत सापाची अथवा मातीच्या सापाची मूर्ती तयार करून, चंदनाने चित्र काढून पूजा करून सापाला दूध पाजवले जाते़ सापाला दूध पाजवणे म्हणजे अंधश्रध्दा आहे़ वास्तविक पाहता साप दूध पीत नाही़ तो कीटक भक्षक आहे़ तो बेंडूक, सरडे, पक्षांची अंडी, पिल्ल, छोटे पक्षी, उंदीर हे सापाचे खाद्य आहे़ सापामुळे शेतातील पिकास हानीकारक असणारे हे किटक खाल्ल्याने पिकांचे संरक्षण होते़ तो शेतकऱ्यांचा मित्र ठरतो़ त्यामुळे साप आढळून आल्यास त्याला दूध पाजू नये़ तसेच त्याला न मारता सोडून पर्यावरणाच्या संवर्धनासाठी मदत करावी, असे सर्पमित्र नेताजी जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले़जून-जुलै या महिन्यातील थंड वातावरण सापांना भावणारे असते़ अशा वातावरणात ते बिळ, वारुळा ऐवजी जमिनीवर राहणे पसंत करतात़ पावसाचे पाणी बिळात शिरल्याणे ते बिळाऐवजी जमिनीवर थंड जागेत झाडांच्या आळ्यात तसेच थंड जागेत आश्रय घेतात. हे वातावरण सापाच्या पिल्लांची वाढ व भरण पोषणासाठी पोषक असतो़ शेतातही पीक उगवलेली असतात़ आपल्या भक्षाच्या शोधात अथवा विश्रांतीसाठी साप पीक, अडगळीच्या जागा, मोठ्या दगडांच्याखाली आश्रय घेतात़ त्यामुळे शेतात काम करतंना शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे़ विषारी साप चावल्यास सर्वप्रथम न घाबरता प्रथमोपचार करणे गरजेचे आहे़ ज्या ठिकाणी साप चावला़ त्याच्या बाजूस कपड्याने घट्ट बांधून विष प्रवाह तेथेच थांबवावा व वैद्यकीय उपचार घ्यावेत़
साप हा माणसाचा शत्रू नव्हे, तर पर्यावरण संवर्धक मित्रच
By admin | Updated: August 19, 2015 00:02 IST