शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंधोऱ्याच्या शाळेत निघतात साप अन् विंचू

By admin | Updated: August 8, 2016 00:41 IST

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा हे गाव आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे

काक्रंबा : तुळजापूर तालुक्यातील गंधोरा हे गाव आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतले आहे. या गावातील जिल्हा परिषद शाळेची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या अतिधोकादायक इमारतीत बसून विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. एवढेच नाही, तर फरशीखालून साप, विंचू निघण्याच्या घटनाही सातत्याने घडत आहेत. असे असतानाही काँग्रेसची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेकडून नवीन वर्गखोल्यांसाठी निधी मिळत नसल्याने पालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.साडेतीन ते चार हजार लोकसंख्या असलेल्या गंधोरा गावात जि.प. ची इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत शाळा आहे. सदरील शाळेची इमारत ही १९४२ मध्ये लोकसहभागातून बांधण्यात आलेली आहे. त्यामुळे ही इमारात सध्या कालबाह्य झालेली आहे. इमारतीच्या भिंतीला जागोजागी तडे गेले आहेत. स्लॅबचे प्लास्टरही निखळून पडत आहे. बीमही झुकला असून पाऊस पडल्यानंतर इमारतीला गळती लागते. येथेच विद्यार्थी ज्ञानाचे धडे गिरवित आहेत. शाळेतील नऊ पैकी ८ वर्गखोल्या अतिधोकादायक आहेत. ही बाब जि.प. बांधकाम विभागाचे अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी आदींच्या भेटीतही समोर आली. दरम्यान, दोन ते तीन वर्षापासून शाळा व्यवस्थापन समिती, ग्रा. पं. सदस्य, ग्रामस्थ शासनाकडे नवीन वर्गखोल्या बांधण्याबाबत पाठपुरावा करत आहेत. परंतु, प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आठ दिवसांत इमारतीचा प्रश्न मार्गी नाही लागल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच प्रभाकर भोसले यांनी दिला आहे.शाळा समाज मंदिर अथवा विठ्ठल मंदिर, ग्रामपंचायत अथवा अंगणवाडीमध्ये भरविण्यात यावी, असा सल्ला शाळेला देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, आमदार मधुकरराव चव्हाण यांनी दत्तक घेतलेले हे गाव आहे. या गावातील शाळेचीच अशी अवस्था झाली असले तर दुसऱ्या शाळेचा विचार न केलेलाच बरा. ४याबाबत केंद्रप्रमुख तानाजी महाजन म्हणाले की, गंधोरा जि.प. शाळेची पूर्ण इमारतच अतिधोकादायक बनल्याने बसण्यासाठी योग्य नाही. परंतु नवीन वर्ग खोल्यांना मंजुरी देण्यासाठी ग्रा.पं. ने जागा उपलब्ध करुन दिल्यास येथील शाळेचा प्रश्न तात्काळ मार्गी लागेल, असे ते म्हणाले.