शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

निविदांवरून धुसफूस

By admin | Updated: September 1, 2014 01:09 IST

लातूर : लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने विकासकामांचा सपाटा लावला आहे़ दहा दिवसांपूर्वी स्थायी समितीने १३३ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला केवळ अर्ध्या तासात मंजुरी दिली़

लातूर : लातूर शहर महानगरपालिका प्रशासनाने विकासकामांचा सपाटा लावला आहे़ दहा दिवसांपूर्वी स्थायी समितीने १३३ कोटी रुपयांच्या कामांसाठी मागविण्यात आलेल्या निविदेला केवळ अर्ध्या तासात मंजुरी दिली़ त्यानंतर शनिवारी झालेल्या स्थायी बैठकीतही ३ कोटी १४ लाखाच्या निविदेला मंजुरी देत लागलीच वर्क आॅर्डर काढण्याचा ठराव मांडला़ प्रत्येकी ५० लाखाच्या कामाचे पाच टेंडर निघणार असून यात ‘मॅनेज’ सिस्टीम राबविण्यात येत असल्याचा आरोप नगरसेवकाने केला आहे़लातूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात मनपाने विविध कामे हाती घेतली आहेत़ मिनी मार्केट ते शिवाजी चौक, शिवाजी चौक ते पीव्हीआर चौक रस्त्याच्या डांबरीकरण कामासाठी आॅनलाईन निविदा मागविण्यात आल्या होत्या़ ३ कोटी ३४ लाखांचा निधी असलेल्या या कामासाठी धनचंद्र कन्स्ट्रक्शन, वैशाली कन्स्ट्रक्शन, रेड्डी कन्स्ट्रक्शन, खतीब कन्स्ट्रक्शन यांनी निविदा भरली होती़ चार कंत्राटदारांपैकी वैशाली कन्स्ट्रक्शनची निविदा तांत्रिक तपासणीत बाद ठरली़ धनचंद्र कन्स्ट्रक्शनने अबोव्ह ९़९८, खतीब कन्स्ट्रक्शनने १५़८९ निविदा भरली होती़ रेड्डी कन्स्ट्रक्शनची निविदा आलेली असतानाही ती ओपन करण्यात आली नाही़ या दोन कंत्राटदारांपेक्षा रेड्डी कन्स्ट्रक्शनचा निविदा कमी दरात आहे, असा दावा नगरसेवक राहुल माकणीकर यांनी केला आहे़ राजकीय वरदहस्त असलेल्या बड्या कंत्राटदाराची निविदा मनपा प्रशासनाने मंजूर करण्याचा घाट घातल्याचा आरोप करीत माकणीकर यांनी केला. नियम डावलून मनपा प्रशासन राजकीय दबावापोटी मर्जीच्या कंत्राटदाराला कामे वाटप करीत असल्याचा आरोप केला जात आहे़ निविदा आॅनलाईन असल्या तरी त्या मॅनेज केल्या जात असल्याचा आरोप माकणीकर यांनी केला आहे़ ३ कोटी ३४ लाख खर्च करून मिनी मार्केट ते पीव्हीआर चौक मार्गावरील चौदपरी रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहे़ हा कामाच्या निविदेला सोमवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात येणार असून लागलीच वर्कआॅर्डर देण्याच्या हालचाली सुरू आहेत़ (प्रतिनिधी)मिनी मार्केट ते पीव्हीआर चौक या मार्गावरील रस्त्याच्या कामासाठी ४ कंत्राटदारांनी निविदा भरली होती़ या प्रक्रियेत रेड्डी कन्स्ट्रक्शन यांनीही सहभाग घेतला होता़ त्यांचे टेक्निकल निविदा पात्र ठरली आहे़ मात्र, फायनन्सियल निविदा उघडण्यास प्रशासन दबावापोटी तयार नाही़ ही निविदा उघडून बघितल्यास त्यात मनपाचे किमान ४० ते ५० लाख रूपये वाचतील, ही बचत दिसून न आल्यास मी नगरसेवक पदाचा राजीनामा देईऩ अन्यथा मनपा आयुक्तांनी राजीनामा द्यावा, असे आव्हान नगरसेवक राहुल माकणीकर यांनी दिले आहे़ २६ आॅगस्ट रोजी रेड्डी कन्स्ट्रक्शनच्या वतीने मनपा आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे़ त्यात त्यांनी प्रकृती चांगली नसल्यामुळे सदरील कामाकडे लक्ष देवू शकत नाही, असे वाटत असल्यामुळे मी सदरील निविदेमध्ये भाग घेऊ शकत नाही, म्हणून माझी निविदा उघडू नये या निविदेवर माझा कसलाही आक्षेप राहणार नाही, असे पत्रात नमूद केले आहे़