शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

स्मार्ट सिटीच्या बैठकीस सापडला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:43 IST

स्मार्ट सिटीचे मार्गदर्शक तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी २९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत स्मार्ट सिटीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरची बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : स्मार्ट सिटीचे मार्गदर्शक तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी २९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत स्मार्ट सिटीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरची बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे.स्मार्ट सिटीसाठी दिलेल्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने करायचा, यावर निर्णय होत नाही. प्रकल्प सल्लागार समिती बैठका आयोजित करण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे शहर स्मार्ट करण्याची संपूर्ण प्रक्रियाच रखडली आहे.शासनाने स्मार्ट सिटीच्या उपक्रमासाठी अगोदर अपूर्व चंद्रा यांची निवड केली होती. त्यांची बदली झाल्यानंतर पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र आजपर्यंत ते औरंगाबादला बैठक घेण्यासाठी आलेच नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर मुंबईला एका बैठकीनिमित्त गेले होते. त्यांनी पोरवाल यांची भेट घेतली.पोरवाल यांनी २९ नोव्हेंबरला औरंगाबादेत बैठक घेण्यास सहमती दर्शविल्याचे मुगळीकर यांनी नमूद केले. ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेकल) माध्यमातून सोलार प्रकल्प आणि स्मार्ट लायटिंगच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी. शहर बसचा विषय योग्य आहे. त्यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, हरित औरंगाबादला प्राधान्य द्या, असेही पोरवाल यांनी सांगितले. स्वच्छ आणि हरित शहराचा कृती आराखडा द्या, अशी सूचना त्यांनी केली. शहर बससंदर्भात ही सेवा नेमकी कोण चालविणार याची माहिती द्या, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले. सोलार प्रकल्प, स्मार्ट लायटिंग आणि घनकचरा व्यवस्थापन याबद्दलचे प्रकल्प अहवाल तयार आहेत, असे मुगळीकर यांनी सांगितले.