शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

डंख छोटा; धोका मोठा

By admin | Updated: April 25, 2016 00:51 IST

औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण अशा स्वच्छ पाण्यावर हिवतापाचे डास अंडी घालतात. शिवाय शहरातील विविध भागांमधील नादुरुस्त ड्रेनेजलाईन, साचलेली डबकी, तुंबलेल्या नाल्यांमुळेही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना प्रशासनाचे मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.२५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूपासून होतो. हे जंतू अ‍ॅनाफिलिस मादी डासाद्वारे प्रसारित होतात. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना दरवर्षी या रोगाची लागण होते. राज्यात हिवतापाच्या जंतूचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. डासांच्या अळीचे नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवतापासह डेंग्यू, चिकुन गुनियाचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. सध्या पाणीटंचाईमुळे पाण्याची साठवण करण्यावर नागरिकांचा भर आहे. पाणी वाया न घालता ते अधिक दिवस साठविण्यावर नागरिकांचा भर आहे. परंतु पाणी झाकून न ठेवल्यास त्यावर हिवतापाचे डास अंडी घालण्याची शक्यता असते. साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कूलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इ. डासांच्या उत्पत्तीची स्थाने म्हणून पाहिली जातात. परंतु शहरात ठिकठिकाणी नादुरुस्त ड्रेनेजलाईन आणि त्यामुळे साचलेली डबकी दिसून येतात. त्याच्या दुरुस्तीकडे अनेक दिवस दुर्लक्ष केले जात असल्याने अशा ठिकाणीही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. परंतु अशा परिस्थितीकडे प्रशासन गांभीर्याने पाहायला तयार नसल्याचे दिसते. त्यातूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.