शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडमधील कत्तलखान्यांना इतके दिवस अभय कोणाचे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 00:10 IST

सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली.

बापू सोळुंके ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सिल्लोडमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तीन कत्तलखान्यांवर दोन दिवसापूर्वी पोलिसांनी धाड मारून सुमारे ५० टन मांस जप्त के ले आणि ११५ जनावरांची मुक्तता केली. या कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असली तरी या कत्तलखान्यांची खबर सिल्लोड पोलिसांना नव्हती का? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अवैध धंद्याबाबत पोलिसांची एवढी डोळेझाक कोणाच्या इशाºयावरून सुरू होती आणि काल झालेली कारवाई कोणाच्या दबावाखाली करण्यात आली, यावरून आता राजकीय तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.कोणताही अवैध व्यवसाय चार दिवसांपेक्षा अधिक काळ पोलिसांपासून लपून राहू शकत नाही, असे म्हटल्या जाते. यामुळे अवैध धंदे करणारे प्रथम पोलिसांसोबत अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करतात. नंतरच ते त्यांच्या व्यवसायाचा श्रीगणेशा करतात, असे म्हटले जाते. जर हे सत्य असेल तर मग सिल्लोड पोलिसांना या कत्तलखान्यांची माहिती होती, असे म्हणावे लागेल. सिल्लोड येथील तीन कत्तलखान्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी चार कर्मचाºयांसह धाड मारली तेव्हा तेथे सुमारे तीनशेहून अधिक जनावरांची कत्तल केलेली आढळली आणि कत्तलीसाठी आणण्यात आलेली अन्य ११५ जनावरे मिळाली. कत्तलखान्यांत एवढ्या मोठ्या संख्येने आणण्यात येणाºया जनावरांची ने-आण करण्यासाठी ट्रक, टेम्पोचा वापर होतो. एवढेच नव्हे तर जनावरांचे मांस विक्री आॅर्डरप्रमाणे मोठ्या वाहनांतूनच केली जाते. ही वाहतूक नियमितपणे अनेक वर्षांपासून सुरू होती, असे म्हटले जाते. तर मग ग्रामीण पोलिसांच्या वाहतूक शाखा, सिल्लोड शहर आणि ग्रामीण पोलिसांना एवढ्या दिवसात मांस आणि जनावरांची वाहतूक करणाºयांवर कारवाई का केली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे. राज्य गुप्तवार्ता विभागासोबत ग्रामीण पोलिसांच्या विशेष शाखेच्या अधिकारी, कर्मचाºयांना याविषयी माहिती मिळाली नसेल तर चिंताजनक आहे. चोरीची जनावरे कत्तलीसाठी वापरल्या जात होती, असे सूत्रांनी सांगितले.अवैध धंद्यांनी गाठला कळस३ ते ४ जनावरे घेऊन जाणा-या वाहनाचा पाठलाग करीत असताना कत्तलखाने मिळाल्याचे पोलिसांचे सांगणे, म्हणजे अवैध धंद्याकडे डोळेझाक करण्याचा बाबतीत पोलिसांनी गाठलेला कळसच आहे.राजकीय कारवाई...सूत्रांनी सांगितले की, हैदराबादेतील आमदार राजासिंह ठाकूर यांच्या सभेच्या पूर्वसंध्येला ही कारवाई करण्यात आली होती. राजकीय श्रेय लाटण्याच्या उद्देशाने सभेवरून वाद निर्माण केला गेला.या सभेच्या पूर्वसंध्येलाच पोलिसांनी कत्तलखान्यांवर धाड मारण्यात आल्याने ही मोठ्या नेत्याच्या इशाºयाने कारवाई झाल्याची चर्चा सध्या सुरू आहे.