शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

२२२ वृक्षांची कत्तल

By admin | Updated: July 15, 2015 00:41 IST

सोयगाव : येथून जवळच असलेल्या जि.प. सिंचन विभागाच्या पाझर तलावाच्या भिंतीवरील सुमारे २२२ डेरेदार वृक्षांची चोरटी वीज घेऊन कटरच्या साह्याने सोमवारी (दि. १३) कत्तल करण्यात आली.

सोयगाव : येथून जवळच असलेल्या जि.प. सिंचन विभागाच्या पाझर तलावाच्या भिंतीवरील सुमारे २२२ डेरेदार वृक्षांची चोरटी वीज घेऊन कटरच्या साह्याने सोमवारी (दि. १३) कत्तल करण्यात आली. महसूल व महावितरण विभागाला माहिती देऊनही वेळेवर घटनास्थळी न गेल्यामुळे ही झाडे तोडली गेली.सोयगाव येथून जवळच अजिंठ्याच्या डोंगर पायथ्याशी रुद्रेश्वर पाझर तलाव आहे. जि.प. सिंचन विभागाच्या अखत्यारीतला हा पाझर तलाव आहे. या तलावाच्या भिंतीवरील अनेक वर्षाची डेरेदार वृक्ष आज पहाटेपर्यंत उभी होती; परंतु आज सकाळी महावितरणच्या विद्युत तारांवर आकडे टाकून कटर मशिनच्या साह्याने ही सुमारे २२२ झाडे काही तासात तोडण्यात आली. झाडे तोडली जात असताना काही वृक्षपे्रमी शेतकऱ्यांनी याबाबत ‘लोकमत’कडे माहिती दिली. दुपारी वृक्षप्रेमी शेतकरी गणेश काळे, सुनील काळे, सुनील ठोंबरे घटनास्थळी पोहोचले. तेव्हा सर्व झाडे तोडलेले होती. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना वृक्षतोडीचा पंचनामा करून संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी केली; परंतु सर्वांनीच उडवाउडवीची उत्तरे दिली. महसूल, महावितरण व जि.प. सिंचन विभागाच्या डोळेझाकपणामुळे सदरील झाडांची कत्तल झाल्याचे दिसत आहे.