शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

सोळा लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार

By admin | Updated: June 27, 2017 01:04 IST

औरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे,

स.सो. खंडाळकर । लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देवेंद्र फडणवीस सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर मराठवाड्यातील तीस लाख शेतकरी खातेदारांपैकी सोळा लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार आहे, यासाठी सात हजार कोटी रुपये लागणार आहेत. कर्जाचे पुनर्गठन केलेल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार असला तरी त्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कायम राहणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज दीड लाखापेक्षा अधिक आहे, त्यांना उर्वरित कर्ज फेडण्यासाठी मुदत देण्याची गरज आहे, तसेच एकाच वेळी कर्ज भरता येणे शक्य नसल्यामुळे त्यांना कर्जाचे हप्ते बांधून दिले गेले पाहिजेत. ३० जून २०१६ पर्यंतच्या कर्ज थकबाकीदारांचा कर्जमाफी मिळणार आहे. जून २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीची अपेक्षा होती. मराठवाड्यात ३४ लाख ८२ हजार शेतकरी खातेदार असून, त्यापैकी २७ लाख ३५ हजार शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. सरकारने दीड लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्यामुळे मराठवाड्यातील ३० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल; पण त्यापैकी दीड लाखापर्यंत कर्ज असलेल्या सोळा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल. त्यात १२ लाख शेतकरी एक लाखापर्यंत पीक कर्ज असलेले आहेत, तर चार लाख शेतकरी दीड लाखापर्यंत कर्ज असलेले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली. ३० टक्केच परतफेड या वाटप झालेल्या कर्जाची ३० टक्केच परतफेड झाली. उर्वरित कर्जाचे पुनर्गठन व जुन्याचे नवे करण्यात येऊन शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा कायम राहिला. दरवर्षी थकीत कर्जावर वाढणारे व्याज आणि चक्रवाढ व्याज यामुळे शेतकरी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकला. मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर गेल्या चार वर्षांत विविध बँकांचे ३० हजार कोटींचे कर्ज थकले आहे.