शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीत सहा हजार क्विंटल साखरेचा ‘गोडवा’

By admin | Updated: August 13, 2014 00:59 IST

दिनेश गुळवे, बीड सणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे.

दिनेश गुळवे, बीडसणासुदीच्या काळात एकीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी दुसरीकडे मात्र स्वस्त धान्य दुकानांमधून लाभार्थ्यांना साखरेची वितरण करण्यात येत आहे. जिल्ह्यातील विविध गोदामांमध्ये सहा हजार क्विंटल साखर आली असून आणखी साठ हजार क्विंटल साखर येणार आहे. एक फेबु्रवारीपासून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत गहू, तांदूळ, भरडधान्य लाभार्थ्यांना योग्य किंमतीत मिळू लागले आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील अडीच लाख शिधापत्रिकाधारकांना मिळत आहे. आतापर्यंत स्वस्त धान्य दुकानावर येणारी साखर ठरवून दिलेल्या डिलरकडून दुकानदारांना घ्यावी लागत असे. आता मात्र ही साखरही सरकारी धान्य गोदामातून वितरीत केली जाणार आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना येणाऱ्या विविध अडचणी सुटल्या जाणार आहेत. गेल्या काही दिवसात खुल्या बाजारातील साखरेचे दर कमालीचे वाढले आहेत. साखर ३५ ते ३८ रुपये किलो दराने खुल्या बाजारात मिळत असल्याने सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर आता स्वस्त धान्य दुकानात साखर आल्याने राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थ्यांसह अंत्योदय योजनेच्या शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ मिळणार आहे. सध्या श्रावण महिना असून यामध्ये विविध व्रतवैकल्य असतात. तसेच अगामी काळात पोळा, गौरीपूजन, गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळी असे सण आहेत. अशा सणासुदीच्या काळात रेशन दुकानवर साखर येणार असल्याने शिधापत्रिकाधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. सध्या जिल्ह्यासाठी ६ हजार ७४ क्विंटल साखल आली असून ती जिल्ह्यातील विविध शासकीय गोदामातून वितरीत केली जात असल्याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयातील वखरे यांनी दिली. तसेच अगामी काळात आणखी आठ हजार ३४ क्विंटल साखर येणार असल्याचेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)