शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:36 IST

भोकरदन येथील घटना : संतप्त नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चा भोकरदन : शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. काजीवेस परिसरात ...

भोकरदन येथील घटना : संतप्त नागरिकांचा नगर परिषदेवर मोर्चाभोकरदन : शहरात सोमवारी पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातला. काजीवेस परिसरात सहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून, पैकी दोघे सख्खे भाऊ आहेत. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढून मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.काजीवेस परिसरात फरहान जाकेर खान पठाण (२) व माजेद जाकेर खान पठाण (७) या सख्ख्या भावांना चावा घेऊन गंभीर जखमी केले. तसेच ओम तळेकर (४) व अन्सार खान (१८) यांना चावा घेऊन जखमी केल्यामुळे नागरिक संतप्त झाले. त्यांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढला होता़शहरात गेल्या काही महिन्यांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. याबाबत नागरिकांनी नगर परिषदेला निवेदन दिले होते. मात्र नगर परिषदेने नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले. याचा परिणाम व्हायचा तोच झाला. सोमवारी सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान काजीवेस परिसरातील गल्लीमध्ये खेळत असलेल्या फरहान जाकेर खान पठाण याच्यावर कुत्र्याने हल्ला करून गालाचा लचका तोडला. भावाला वाचविण्यासाठी गेलेल्या माजेद जाकेर खान पठाणच्या डाव्या हाताला चावा घेतला. तसेच याच परिसरातील ओम तळेकर, अन्सार खान, अन्सार पठाण (१७) व द्वारकाबाई जाधव (६५) या चौघांनाही चावा घेऊन गंभीर जखमी केले. आजूबाजूच्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यामुळे काही जणांनी कुत्र्याला पिटाळले. त्यानंतर जखमींना भोकरदन ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉ. अजय देशमुख, डॉ. अमोल मुळे, डॉ युसूफ खान यांनी औषध उपचार केले. पैकी गंभीर जखमी दोघा भावांना औरंगाबादला हलविण्यात आले. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढून मुख्याधिकाºयांना धारेवर धरले. अगोदरच कुत्र्यांचा बंदोबस्त केला असता, तर ही घटना घडली नसती असा मुद्दा शेख महेबूब, नईम कादरी, हबीबखॉ पठाण यांनी उपस्थित केला. या वेळी अनिस भारती, शेख बाबर, नाजेम खान, शेख रईस, सलमान खान, विनोद गायकवाड, समदाणी शहा, शेख कालू, जाकेर खान, रिजवान शेख निसार शेख आदी उपस्थित होते.-------------मुख्याधिका-यांनी दिली लेखी हमीसंतप्त नागरिकांची समजूत घालणे मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे यांना कठीण झाले. त्यांनी पिसाळलेल्या कुत्र्याचा दोन दिवसांत बंदोबस्त करू, अशी लेखी हमी दिली. तसेच नागरिकांनी आपले पाळीव कुत्रे स्वत: सांभाळावे, असे आवाहन केले. या वेळी माजी नगराध्यक्ष राजाभाऊ देशमुख, नगरसेवक शेख कदीर, संतोष अन्नदाते यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.