शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सहा जणींचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:49 IST

तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर (जि. जालना) : तालुक्यातील कस्तुरवाडी येथे नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींसह त्यांच्या मामेबहिणीचा बुडून मृत्यू झाला. तर परतूर तालुक्यातील वाई येथे घडलेल्या दुसºया घटनेत हाकललेली वानरे दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. तिसºया घटनेत एक वृद्धा दगावली.कस्तुरवाडी येथे दुपारी साडेअकरा वाजेच्या सुमारास गावाजवळील लाहुकी नदीत काही महिला कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. नदीत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नदी खोलीकरणाचे काम झालेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. कपडे धूत असताना सायमा जुम्मेखॉ पठाण (१४) गजाला शेख मोईन (१९) व राणी उर्फ सुरया शेख मोईन (१३) तिघी पाण्यात पडल्या. त्यांनी एकमेकींना वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोहता येत नसल्याने खोल पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये गजाला व सुरया या सख्ख्या बहिणी असून सायमा त्यांची मामेबहीण होती. या मुलींना वाचवायच्या प्रयत्नात सीमा शे शब्बीर (१३) हिचाही तोल गेला, मात्र ती सुदैवाने वाचली.घटनेची माहिती मिळताच आ. नारायण कुचे, पंचायत समिती सदस्य हरिश्चंद्र शिंदे, तहसीलदार प्रवीण पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सचिन बारी, पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ पोहोचले. गावातील समीर पठाण, अय्याज बेग, नौशाद बेग, अखतर पठाण, रऊफ बेग, युसूफ पटेल, सरवर बेग, भानुदास कोल्हे, आरिफ खान, शकील पठाण, अफजल बेग, भाऊसाहेब कोल्हे, अझहर खान पठाण यांच्या मदतीने मुलींचे मृतदेह बाहेर काढले. माजी आ. संतोष सांबरे यांनीही मदतकार्य केले. वरूडी येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णवाहिकेतून मृतदेह बदनापूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी भोकरदन ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक विजय गायकवाड तपास करीत आहेत.गावातील रऊफ बेग म्हणाले की, मी या तीन मुलींपैकी सायमा पठाण या मुलीस पाण्याबाहेर काढले. त्यावेळी तिचा श्वास सुरू होता, जर आम्हाला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली असती ती वाचली असती.यावर आमदार निधीतून रुग्णवाहिका देता येत नसेल तर मी वैयक्तिक निधीतून देईन, असे आश्वासन आ. नारायण कुचे यांनी ग्रामस्थांना दिले.वाईत दोन बहिणींचा बुडून मृत्यूपरतूर : वडिलांनी झाडावरून हाकललेली वानरे विहिरीजवळ उभ्या असलेल्या दोन बहिणींच्या दिशेने पळाल्याने घाबरून विहिरीत तोल गेल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. मंठा तालुक्यातील वाई येथे रविवारी सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. मृत बहिणींची नावे साक्षी गायकवाड (९) व मीनाक्षी गायकवाड (६) अशी आहेत.केशव गायकवाड हे सकाळी अकरा वाजता शेतातील लिंबाच्या झाडावरील वानरे हाकलत होते. त्या वेळी साक्षी व मीनाक्षी शेतातील विहिरीजवळ उभ्या होत्या. झाडावरून हाकललेली वानरे विहिरीच्या दिशेने पळाली. यामुळे घाबरलेल्या दोघींचा विहिरीत तोल गेला.वडिलांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. नंतर पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपनिरीक्षक के.के. शेख तपास करीत आहेत. साक्षी व मीनाक्षी या दोघी गावातील शाळेत जातात. रविवार असल्यामुळे त्या सकाळी वडिलांसोबत शेतात गेल्या होत्या. शेतात गेल्या नसत्या तर दोघी वाचल्या असत्या, अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.भराडखेडा येथील वृद्धेचा मृत्यूजालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यातील भराडखेडा येथील वृध्देचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास गट न ५७ मधे देवूबाई रामभाऊ मुळक (६०) या गवत कापत असताना त्यांचा विहिरीत पडुन मृत्यु झाला. कृष्णा मुरलीधर मुळक यांच्या खबरीवरून बदनापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे .