शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या उपचारासाठी बहिणीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:14 IST

घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या भावाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी एक बहीण गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती, ओवाळीते भाऊराया, वेड्या बहिणीची रे वेडी माया’ याप्रमाणे बहीण-भावातील नाते प्रेम, माया आणि जिव्हाळ्याने भरलेले असते. भाऊबीजेला भावाला ओवाळून औक्षण करून त्याला सुखी आणि आयुष्यमान कर अशी ईश्वराकडे मागणी बहीण करते. अगदी याचप्रमाणे घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या भावाच्या आयुष्याची दोरी बळकट करण्यासाठी एक बहीण गेल्या अनेक दिवसांपासून धडपड करीत आहे.घाटी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये तसवीर गोंडे (२६, रा. भांबाडा, करमाड) यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची बहीण संगीता गोंडे या भावाच्या उपचारासाठी काळजी घेत आहेत. संगीता गोंडे म्हणाल्या, आई-वडील, तीन भाऊ आणि तीन बहीण अशा कुटुंबातील आमच्या दोघांची उंची जन्मापासून इतरांपेक्षा कमी आहे.वडील भविष्य पाहून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची. बारावी पास असलेला भाऊदेखील भविष्य पाहण्याचे काम करतो. अशातच काही महिन्यांपूर्वी बकरीच्या गळ्यातील दोरीत पाय अडकून तसवीर गोंडे हे पडले. यामध्ये झालेल्या फ्रॅक्चरमुळे अनेक दिवस खाटेवर पडून राहावे लागले.एकाच जागेवर पडून राहिल्याने त्यांच्या पाठीला, हाताला जखमा झाल्या. त्यात श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने नऊ दिवसांपूर्वीच घाटीत दाखल केले, तेव्हा त्यांचे फुफ्फुस बारीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हृदयाची तपासणी केली जात आहे.आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अनेक अडचणींना तोंड देण्याची वेळ येत असल्याचे संगीता गोंडे यांनी सांगितले. या परिस्थितीची माहिती मिळाल्याने के. के. ग्रुपचे अध्यक्ष अकील अहमद, किशोर वाघमारे, जुनेद शेख, महंमद आसेफ, जमीर पटेल यांनी मदतीसाठी धाव घेतली.पाठीतील जखमांमुळे एअर बेड आवश्यक होते. एअर बेडसह औषधी, इंजेक्शन देऊन या लोकांनी मदतीचा हात दिला आहे. भाऊ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सुनीता या क्षणभरही त्यांना एकटे सोडत नाहीत. बहिणीसाठी भाऊ धावून गेल्याच्या बºयाच घटना घडल्या आहेत; मात्र घाटीतील या घटनेने भाऊ-बहिणीतील अतूट नात्याचा प्रत्यय घेणाºया प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.