शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
2
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
3
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
4
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
5
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
6
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
7
हा कसला संयोग! २७ वर्षापूर्वी भीषण अपघातात '11 A' सीटमुळेच वाचला होता आणखी एकाचा जीव
8
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
9
एअर इंडियानं घेतला '171' आकड्याचा धसका; अहमदाबाद दुर्घटनेनंतर इतिहासजमा होणार संख्या
10
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात
11
Ahmedabad Plane Crash : ते सरप्राईज ठरलं शेवटचं! विमान अपघातात मुलाचा आणि सुनेचा मृत्यू, वडिलांना आता एकच आशा
12
देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेनं ग्राहकांना दिलं गिफ्ट, कमी केले कर्जाचे व्याजदर; पटापट पाहा लेटेस्ट दर
13
संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ
14
EXCLUSIVE: 'कोस्टल वॉकवे' मुंबईकरांच्या विरंगुळ्याचं नवं हक्काचं ठिकाण, आयुक्त भूषण गगराणींसोबत खास सफर
15
Bacchu Kadu Hunger Strike: अन्नत्याग आंदोलन स्थगित! बच्चू कडूंना महायुती सरकारने दिली तीन आश्वासने
16
इराण इस्रायल तणावामुळे भारताला किती नुकसान, कच्चं तेल आणि शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी आणि बॉयफ्रेंड राज कुशवाहचा २ वर्षांपूर्वीचा फोटो, चेहऱ्यावर दिसतोय आनंद
18
"एटीसीने विमानाशी संपर्क साधला तेव्हा प्रतिसाद मिळाला नाही अन् एका मिनिटानंतर..."; सरकारने दिली अपघाताची माहिती
19
बेडग-कर्नाटक मार्गावर हत्याराचा धाक दाखवून सात लाख लूटले, गाडीची केली तोडफोड
20
Air India Plane Crash: हॉस्टेलच्या छतावर अडकलेल्या विमानाच्या शेपटीमध्ये सापडला मृतदेह

अपघातात भावंडांचा मृत्यू

By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST

परंडा : कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात खानापूर (ता़उस्मानाबाद) येथील दोघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला़

परंडा : कारने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात खानापूर (ता़उस्मानाबाद) येथील दोघा सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाला़ ही घटना सोमवारी दुपारी शहरानजीक परंडा- बार्शी राज्य मार्गावरील भैरवनाथ तालमीच्या समोर घडली़ तर भूम-वारदवाडी मार्गावरील जवळा फाट्यावर रविवारी रात्री जीप- दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, परंडा शहरातील किशोर पांडुरंग सुतार यांच्या विवाह शुक्रवारी दुपारी शेळगाव (ता़परंडा) येथे होता़ या लग्नासाठी उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील विठ्ठल श्रीराम सुतार (वय-४७) व आण्णा श्रीराम सुतार (वय-५४) हे दोघे शेळगाव येथे आले होते़ लग्न लावल्यानंतर काही वेळाने विठ्ठल सुतार व आण्णा सुतार हे दोघे भावंडे दुचाकीवरून (क्ऱएम़एच़२५- व्ही़२१८५) परंडा मार्गे खानापूर या आपल्या गावाकडे निघाले होते़ त्यांची दुचाकी परंडा- बार्शी राज्य मार्गावरील भैरवनाथ तालमीजवळ आली असता बार्शीहून भरधाव वेगात आलेल्या कारने (क्ऱएम़एच़१२- डी़ई़५२४८) जोराची धडक दिली़ हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीचा चक्काचूर झाला़ तर कार रस्त्याहून ५० फूट बाहेर शेतात फरफटत गेली़ अपघाताची माहिती मिळताच परंडा पोलीस व आरोग्य विभाग तातडीने घटनास्थळी दाखल झाला़ यानंतर वैद्यकीय अधीक्षक डॉ़ संजय वाळके यांनी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेद्वारे या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या विठ्ठल सुतार व आण्णा सुतार यांना उपचारासाठी बार्शी येथील रूग्णालयात पाठविले़ मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती या दोघांनाही मयत घोषित केले़ त्यामुळे मयतांचे शव परत परंडा येथील उपजिल्हा रूग्णालयात आणण्यात आले़ तेथे शवविच्छेदन करून रात्री प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले़ दरम्यान, परंडा तालुक्यातील भूम- वारदवाडी मार्गावरील जवळा फाट्यावरही रविवारी रात्री भरधाव वेगातील जीपने (क्ऱएम़एच़१२- ८२९३) दुचाकीला (क्ऱएम़एच़२५- वाय़४८३३) जोराची धडक दिली़ या अपघातात दुचाकीवरील आयुब बागवान (वय-३२) व बंडू राऊत (वय-३८) हे दोघे गंभीर जखमी झाले़ अपघातानंतर जीपचालक फरार झाल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले. (वार्ताहर) परंडा शहरातील माळे गल्ली येथील किशोर सुतार यांच्या लग्नाला आलेल्या विठ्ठल सुतार आणि अण्णा सुतार यांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच शहरातील त्यांच्या नातेवाईकांनी रूग्णालयात एकच गर्दी केली होती़ नवरदेवाचे चुलत बंधू शंकर सुतार यांची बहीण मृत्यू पावलेले विठ्ठल सुतार यांना देण्यात आली होती़ अपघातात जावायाचा मृत्यू झाल्याने मंगळवार पेठेतील माळेगल्लीवर शोककळा पसरली४उस्मानाबाद तालुक्यातील खानापूर येथील दोन सख्ख्या भावंडांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावावर एकच शोककळा पसरली़ मयत विठ्ठल सुतार व अण्णा सुतार या मनमिळावू बंधूंचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे़ अपघाताची माहिती मिळताच मयतांच्या कुटुंबियांनी परंड्याकडे धाव घेतली़ नातेवाईकांच्या आक्रोषाने येथील रूग्णालय परिसर हळहळला होता़