उद्धव चाटे, गंगाखेडतालुक्यातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात भर देण्यात आला आहे़ तालुक्यातील वैतागवाडी, उंदरवाडी व उंदरवाडीतांडा या तीन गावांनी मिळून एका गणपतीची स्थापना केली आहे़ जून, जुलै, आॅगस्ट महिना पावसाविना गेला़ त्यामुळे तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती़ परंतु, आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने सार्वजनिक गणेश मंडळात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले़ गंगाखेड तालुक्यात १४० गणेश मंडळांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात आहे़ यामध्ये व्याख्यान, प्रवचन, कीर्तन, रांगोळी, निबंध, डान्स स्पर्धा, फळ वाटप विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, सामाजिक देखावे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत़ शहरातील मोंढ्याचा राजा येथील लाल किल्ल्याचा देखावा व सुंदर मूर्तीच्या दर्शनासाठी शहरवासियांची गर्दी होत आहे़ तर प्राध्यापक कॉलनीतील रुद्राक्ष गणेश मंडळाच्या वतीने स्व़ गोपीनाथ मुंडे यांच्या मूर्तीचा देखावा पाहण्यास नागरिक गर्दी करीत आहेत़ शहरामध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी शंकर केंगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जे़जे़ राठोड यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे़ उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस परिश्रम घेत आहेत़ (प्रतिनिधी)गंगाखेड तालुक्यातील वैतागवाडी, उंदरवाडी व उंदरवाडीतांडा ही तिन्हे गावे मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे़ तीन वर्षांपासून येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन तीन गाव एक गणपती ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे़ हा उपक्रम तालुक्यातील इतर गावांसाठीही आदर्श म्हणावा लागेल़ यासाठी गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष चिमाजी वैतागे, सरपंच दगडू भुसनर, पोलिस पाटील तुकाराम जमादे यांचा पुढाकार आहे़ पिंपळदरी पोलिस ठाण्यांतर्गत ५९ श्री गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे़ यामध्ये ३० गावांमध्ये एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे़ ते पुढीलप्रमाणे अंतरवेली, घटांग्रा, सेलमोहा, बोरगाव बु़, बोरगाव खुर्द, डोंगरजवळा, इळेगाव, बोथी, उगडेवाडी, हरिश्चंद्रतांडा, बेलवाडीतांडा, खंडाळी, मार्तंडवाडी, लांडकवाडी, करलेवाडी, उंडेगाव, पिसेवाडी, पांगरी या गावांचा समावेश आहे़ गंगाखेड पोलिस ठाण्यांतर्गत ८१ श्री गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली आहे़ त्यातील १४ गावांत एक गाव एक गणपतीची स्थापना करण्यात आली आहे़
तीन गावांसाठी एकच गणपती
By admin | Updated: September 4, 2014 00:18 IST