शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:28 IST

औरंगाबाद : शाहनूरमिया दर्गा परिसरातील अपेक्स परिजात सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे विकास शुल्क, मालमत्ता, पाणीपट्टीचे पैसे शंभर टक्के भरल्यानंतरही काही ...

औरंगाबाद : शाहनूरमिया दर्गा परिसरातील अपेक्स परिजात सोसायटीतील नागरिकांनी महापालिकेकडे विकास शुल्क, मालमत्ता, पाणीपट्टीचे पैसे शंभर टक्के भरल्यानंतरही काही दिवसांपासून पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. खासगी टँकरने गरज भागवावी लागत आहे. शंभूनगर आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने अनधिकृत नळ घेतले आहेत. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना पाणी मिळत नाही. दिवाळीपूर्वी पाणी प्रश्न सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

उद्यापासून पाच दिवस पाणीपुरवठा कर्मचारी रस्त्यावर

औरंगाबाद : दिवाळीत नागरिकांना नियोजित दिवशीच पाणी मिळावे यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नियोजन केले आहे. शहरात कुठेही जलवाहिनी फुटणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंत काही कर्मचारी पेट्रोलिंगसाठी नेमण्यात येणार आहेत. बुधवारपासून हे कर्मचारी शिफ्टनुसार काम करणार आहेत. जलवाहिनी फुटल्यास त्वरित माहिती देणे आणि युद्धपातळीवर कामाला सुरुवात करणे, अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

बाजारपेठेतील कचरा दोन वेळा जमा करणाार

औरंगाबाद : दिवाळीत खरेदीसाठी बाजारपेठेत अलोट गर्दी होत आहे. व्यापाऱ्यांच्या दुकानांमधून मोठ्या प्रमाणावर कचरा बाहेर येत आहे. महापालिकेच्या घनकचरा विभागाने बाजारपेठेतील कचरा दोन वेळेस उचलण्याचे काम सुरू केले आहे. या कामासाठी अतिरिक्त ३५ रिक्षा नेमण्यात आल्या आहेत. दिवसभरात एकदाही कचरा उचलण्यासाठी वाहन न आल्यास नागरिकांनी घनकचरा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.