शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

वाळू माफियांना फौजदारीचा प्रसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2017 23:39 IST

अंबड : वाळूमाफियांविरोधात उघडलेली मोहीम सोमवारी अधिक तीव्र करण्यात आली.

अंबड : वाळूमाफियांविरोधात उघडलेली मोहीम सोमवारी अधिक तीव्र करण्यात आली. शनिवारी पहाटे अवैध वाळू वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या चार ट्रकपैकी दोन ट्रकला ३ लाख ४ हजार रुपयांचा जबरी दंड ठोठावण्याचे व दोन हायवा ट्रकवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश तहसीलदार दत्ता भारस्कर यांनी सोमवारी दिले. विशेष म्हणजे महसूल विभागातील काही भ्रष्ट व कामचुकार अधिकारी- कर्मचाऱ्यांचा असहकार, लोकप्रतिनिधी व तथाकथित समाजसेवक यांचा वाळू माफियांच्या कारवाईविरोधात प्रचंड दबाव, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे वाळूमाफियांसोबत असलेले संगनमत अशा सर्व परिस्थितीत तहसीलदारांच्या वाळू माफिया विरोधातील एकाकी लढाईला कितपत यश येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.शुक्रवारी रात्री व शनिवारी पहाटे तहसीलदार भारस्कर यांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे चार ट्रक पकडले. हे चारही ट्रक पोलीस ठाणे आवारात लावण्यात आले. धक्कादायक म्हणजे ट्रक लावत असताना चार पैकी दोन मुजोर वाहन चालक ठाण्यातून महसूल पथकादेखत फरार झाले. सोमवारी (एम.एच.४६-एफ-५८७१) व (एम.एच.२०-डी.ई.-९८८२) या दोन हायवा ट्रक यांना प्रत्येकी १ लाख ५२ हजार रुपयांप्रमाणे एकूण ३ लाख ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्याचे तसेच (एम. एच. २०-ई.जी.-५७९९) व (एम.एच.२०-डी. ई.-३२०४) या दोन ट्रक विरोधात अंबड पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार नोंदविण्याचे आदेश तहसीलदार भारस्कर यांनी सोमवारी जारी केले. मागील एक महिन्यापासून भारस्कर यांनी वाळूमाफियांच्या विरोधात जोरदार मोहीम उघडल्यापासून दोन कोतवालांना मारहाण करणे, तहसीलदारांच्या वाहन चालकाला जबर मारहाण करुन चालत्या वाहनासमोर फेकून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व शनिवारी वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकचे मालक ाच्या बहिणीने तीन तलाठ्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणे अशा विविध घटना घडल्या आहेत. अंबड व घनसावंगी तालुक्यात वाळू माफियांची समांतर व्यवस्था कार्यरत आहे. यामध्ये काही भ्रष्ट महसूल अधिकारी-कर्मचारी, काही भ्रष्ट पोलीस अधिकारी-कर्मचारी, काही विविध राजकीय पक्षांचे नेते-कार्यकर्ते, विविध पदांवर असलेले काही लोकप्रतिनिधींपासून रात्रभर वाहनांद्वारे तहसीलदारांवर पाळत ठेवण्याचे काम करणाऱ्या बेरोजगार युवकांपर्यंत अनेकांचा समावेश आहे. या संपूर्ण व्यवस्थेने वाळू माफियांविरोधात सुरु असलेली मोहीम बंद करण्यासाठी प्रचंड दबाव निर्माण केला आहे. एकूणच वाळूमाफियांच्या दहशतीने अंबड व घनसावंगी तालुक्यातील महसूल विभागही हातबल आहे.