शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादच्या तेजसने जिंकले खेलो इंडिया युथ गेम्समध्ये रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 00:49 IST

: पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस सिरसे याने गाजवताना अ‍ॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आणखी भर टाकली आहे.

ठळक मुद्दे११0 मी. अडथळा शर्यतीत केली पदकविजेती कामगिरी

औरंगाबाद : पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेत औरंगाबादचे खेळाडू दिमाखदार कामगिरी करण्याची मालिका सुरू आहे. या स्पर्धेत जिम्नॅस्टिकमध्ये ४ पदकांची लयलूट करणाऱ्या उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडू सिद्धी व रिद्धी हत्तेकर यांच्यानंतर आजचा दिवस तेजस सिरसे याने गाजवताना अ‍ॅथलेटिक्समध्ये रौप्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आणखी भर टाकली आहे.तेजस सिरसे याने आज ११० मीटर अडथळ्याच्या शर्यतीत १४.४८ सेकंदांची वेळ नोंदवताना रौप्यपदकाची कमाई केली. सुवर्णपदक दिल्लीच्या रितेश चौधरी याने १४.३८ सेकंद वेळ नोंदवत जिंकले, तर कास्यपदक हरियाणाच्या कमल याने पटकावले. तेजसने ४ बाय १00 रिलेतही कास्यपदक पटकावले. विशेष म्हणजे तेजस सिरसे याने नवी दिल्ली येथील १४ ते १९ डिसेंबरदरम्यान झालेल्य राष्ट्रीय स्पर्धेत विक्रमी कामगिरी करताना सुवर्णपदक पटकावले होते. त्याने ११० मी. अडथळ्याची शर्यत १४.३६ सेकंदांत जिंकली होती. पडेगाव येथे सायकलवर विद्यापीठाच्या मैदानावर प्रशिक्षक सुरेंद्र मोदी व नितीन निरवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तो सराव करतो. विशेषत: राज्यस्तरीय स्पर्धेत कधीही सहभाग न नोंदवताना त्याने सलग दुसºयांदा पदक जिंकण्याचा भीमपराक्रम केला. तो देवगिरी महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याआधी औरंगाबादच्या सिद्धी व रिद्धी हत्तेकर या जुळ्या बहिणींनी आपला विशेष ठसा उमटवत पदकांची उधळण केली होती. सिद्धी हत्तेकर हिने गुरुवारी सुवर्णपदकाची कमाई केली. सिद्धी हत्तेकर हिने ८.५५ गुणांची कमाई करताना अनइव्हन बार या साधन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. तिची जुळी बहीण रिद्धीने बॅलन्सिंग बीम या साधन प्रकारात १०.४५ गुणांसह कास्यपदक जिंकले. या यशाबद्दल तेजस सिरसे याचे विद्यापीठाचे कुलगुरू बी.ए. चोपडे, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक दयानंद कांबळे, प्रशिक्षक पूनम नवगिरे, देवगिरी महाविद्यालयाचे क्रीडाप्रमुख शेखर शिरसाठ आदींनी त्याचे अभिनंदन केले.