सिल्लोड : शहरासह तालुक्यातील अनेक गावांची तहान भागविण्यासोबतच तालुक्यातील शेतीला बळ देणारा खेळणा मध्यम प्रकल्प बुधवारी तुडुंब भरला. हा प्रकल्प भरल्याने शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.हा प्रकल्प भरल्याने पिण्याच्या पाण्यासोबतच शेतकऱ्यांच्या रबी हंगामाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. मागच्या वर्षीही या प्रकल्पातून रबी हंगामात पाण्याची दोन आवर्तने सोडण्यात आली होती. यंदा पुन्हा हा प्रकल्प भरल्याने रबी हंगामात या प्रकल्पाच्या टापूत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. पाटाच्या पाण्यासोबत विहिरींनाही पाण्याची पातळी वाढत असल्याने हंगामी बागायतीचे क्षेत्र वाढण्याचे संकेत आहेत.खूप उशिराने पेरणी झालेल्या कपाशीच्या पिकांना संरक्षित पाणी देणे शेतकऱ्यांना यामुळे शक्य होणार असल्याने या पिकांच्या बाबतीतली काळजीही आता मिटल्यात जमा आहे.हा प्रकल्प भरल्याने या परिसरातल्या शेतकऱ्यांची येत्या उन्हाळ्यात करण्याच्या पूर्वहंगामी निर्यातक्षम मिरची असो की पूर्वहंगामी कपाशी असो, या पिकांच्या बाबतीतली चिंता मिटली. कारण विहिरींना पाणी राहणार असल्याने उत्पन्नाच्या बाबतीत हमी असणाऱ्या या पिकांचे नियोजन करणे आता शेतकऱ्यांना सोयीचे झाले आहे.जायकवाडीत 27.48 टक्के साठाजायकवाडी धरणात ७ हजार क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू असून धरणात २७.४८ टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रातील नांदूर-मधमेश्वर ८९३८ क्युसेक्स, दारणा २१७२, निळवंडे १३४१, गंगापूर १०७२ क्युसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. बुधवारी धरणात १३३४.७३१ दलघमी जलसाठा झाला.
सिल्लोडचा खेळणा मध्यम प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’
By admin | Updated: September 4, 2014 00:53 IST