शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रेशीम क्लस्टर वर्षअखेरीस कार्यान्वित होणार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2017 00:22 IST

जालना : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी अद्ययावत प्रशिक्षण व माहिती मिळावी म्हणून जालना शहरानजीक रेशीम मार्केट उभारणीस शासनाने मान्यता दिली आहे

जालना : जिल्ह्यातील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना बाजारपेठ मिळावी अद्ययावत प्रशिक्षण व माहिती मिळावी म्हणून जालना शहरानजीक रेशीम मार्केट उभारणीस शासनाने मान्यता दिली आहे. यासाठी ५ कोटी ८२ लाखांचा निधीही मंजूर झाला असून, वर्ष अखेरीस हे क्लस्टर सुरू होईल, असा विश्वास रेशीम विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी रेशीम मार्केटच्या प्रस्तावाचा आढावा घेऊन कोणत्या योजनेतून निधी उपलब्ध करता येईल, याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच संपूर्ण प्रकल्पाचा आढावा घेतला.शहराजवळील सिरसवाडी शिवारात रेशीम मार्केट होत आहे.चार आॅक्टोबर २०१६ रोजी औरंगाबाद येथील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मार्केटला मान्यता देण्यात आली होती. या मार्केटसाठी सहकार व वस्त्रोद्योग मंत्रालयाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून ५ कोटी ८२ लाखांचा निधी मंजूर केला आहे. तुती उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना ज्या काही सुविधा पाहिजे त्या या ठिकाणी पुरविण्यात येणार आहेत. येथे तांत्रिक तसेच कुशल मनुष्यबळ येथे असणार आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष विक्रीसाठी जालना हे मध्यवर्ती ठिकाण आहे. शेतकऱ्यांना व रिलिंग उद्योजकांना कोष खरेदी विक्रीसाठी सोयीस्कर आहे. येथील एकाच मार्केटमध्ये कोष व सूत खरेदी विक्री करण्याची सुविधा असणार आहे. मार्केट निर्मितीमुळे रेशीम लागवड क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करतात. कर्नाटक येथे असलेल्या बाजारपेठेच्या धर्तीवरच ही बाजारपेठ होणार आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत रेशीम शेतीवर भर दिला आहे. कमी दिवसांत व नगदी पीक म्हणून जिल्ह्यात तुती लागवड वाढली आहे. कर्नाटकऐवजी स्थानिक बाजारपेठ महत्वाची भूमिका बजावणार आहे. बाजारपेठेचा जालना सोबतच तब्बल दहा हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ३ हजार ९०० एकर तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार ४०० शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळत असल्याचे रेशीम अधिकाऱ्यांनी सांगितले.