शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राबविणार रेशीम अभियान...!

By admin | Updated: March 6, 2017 00:44 IST

जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली

जालना : रेशीम मार्केटच्या प्रस्तावानंतर आता जिल्ह्यातील तुती (रेशीम) लागवडीत वाढ व्हावी म्हणून ३७ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली असून, त्या माध्यमातून रेशीमचे क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. पारंपरिक पिकासोबतच नगदी व कमी वेळेत व जास्त उत्पादन देणारे पीक म्हणून तुती लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. यामुळेच जालना येथे रेशीम क्लस्टची संकल्पना प्रत्यक्षात येत आहे. याविषयी अधिक माहिती देताना रेशीमचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप हाके म्हणाले, मार्केटसोबतच रेशीम क्षेत्र वाढाविण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे. जालना जिल्ह्यात रेशीम शेतीसाठी ३७ गट कार्यरत आहेत. एक गटात दहा ते बारा शेतकरी आहेत. मराठवाड्यात ३ हजार ९०० एकर एवढे तुतीचे क्षेत्र आहे. यात ३ हजार शेतकरी व तेवढेच शेतकरी व रेशीम व्यावसायिक जोडलेले गेलेले आहेत. शेतकऱ्यांना रेशीम शेती व तुती लागवडीसाठी लागणारी माहिती, अनुदान व प्रशिक्षण जिल्हा कार्यालयातून देण्यात येत असून, शेतकरी गटाच्या माध्यमातून याचा विस्तार होत आहे. तुती पिकाची १७ ते २० दिवसांत वाढ होते. अल्प दिवसांत येणाऱ्या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड करावी म्हणून संपूर्ण जिल्हाभरात रेशीम शेती अभियान राबविण्यात येणार आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावले असून, जिल्ह्यात १५० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रेशीम शेती करण्यात येते. जालना येथे होत असलेल्या रेशीम मार्केटचा विकास व्हावा या उद्देशासाठी रेशीम अभियान महत्वपूर्ण ठरणार आहे. रेशीम उत्पादन वाढल्यास त्याची विक्री थेट जालन येथील बाजारपेठेत करण्यात येणार आहे. सोबतच उत्पादन वाढीमुळे कर्नाटक राज्यातील व्यापारी रेशीम कोष खरेदीसाठी जालना बाजारपेठेत येऊन महसुलात वाढ होऊन शेतकऱ्यांचा याचा फायदा होण्याचा अंदाज रेशीम अधिकारी व्यक्त करीत आहेत. वर्ष अखेरी रेशीम क्लस्टर सुरू होण्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)