शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाºयांचा मूकमोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:03 IST

विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : मागील महिन्यात अंबड येथे झालेल्या गोविंद गगराणी खून प्रकरणाचा निषेध नोंदवितानाच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळावी आणि आरोपींना कठोर शासन व्हावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापारी आणि समाजबांधवांच्यावतीने सोमवारी जालन्यात मूकमोर्चा काढण्यात आला. शिवाजी पुतळा ते मामा चौकापर्यंत काढण्यात आलेल्या मोर्चात व्यापारी बांधवांसह महिला व मुलींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.मोर्चाच्या समारोपप्रसंगी स्व. गोविंद गगराणीच्या बहिणींनी गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्याची मागणी केली. त्यांच्या भावना ऐकताना उपस्थितांना अधिकच गहिवरुन आले. शालेय जीवनातून महाविद्यालयीन विद्यार्थीदशेत दाखल झालेल्या गोविंद गगराणीच्या खूनाची घटना खंडणीच्या कारणावरुन घडल्याचा खुलासा पोलिसांकडून करण्यात आला आहे. खूनाच्या घटनेचा निषेध नोंदविण्यासह आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी यापूर्वीच जिल्ह्यातील अंबड, परतूर, जाफराबाद आदी ठिकाणी मुकमोर्चा निघाला आहे. जालन्यातही मोर्चाच्या माध्यमातून या प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यात आला. सकाळी अकरा वाजता शिवाजी पुतळा येऊन राममंदिर चौक, टांगास्टॅण्ड, सिंधी बाजारमार्गे निघालेला हा मोर्चा दुपारी साडेबारा वाजता मामा चौकात पोहोचला. मूकमोर्चात उपनगराध्यक्ष राजेश राऊत, माजी आ. अरविंद चव्हाण, संजय खोतकर, संतोष सांबरे, भाजपचे भास्कर दानवे, डॉ. सुभाष अजमेरा, उद्योजक किशोर अग्रवाल शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, यांच्यासह व्यापारी बांधव सहभागी झाले होते.