शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

विषारी वायूचा पिकांवर दुष्परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2016 00:34 IST

राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत.

राजूर : विषारी वायू गळतीमुळे घटनास्थळा लगतच्या पीक क्षेत्रास बाधा पोहोचली खरी. परंतु, आता दूरवरच्या पिकांवर सुध्दा दुष्परिणाम होण्याची लक्षणे दिसत आहेत. यामुळे आता नुकसानग्रस्त पीक क्षेत्राचे पंचनामे लांबणीवर टाकण्यात आले आहेत.जालना - भोकरदन रस्त्यावरील राजूरजवळ सोमवारी रात्री आठ वाजेपासून ४० तासांपर्यंत क्लोरोसोल्फोनीक अ‍ॅसिडची वायू गळती झाली. गळतीमुळे विषारी वायूचे अवाढव्य लोळ उठले. या वायूमुळे परिसरातील मका, कापूस, ऊस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, उडीद आदी पिकांना बाधा पोचून पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी २० जुलै रोजी नुकसान भरपाईसाठी रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. यावर प्रशासनाने शेतकऱ्यांची ओरड लक्षात घेऊन कृषी विभागाला पंचनामे करण्याचे तातडीने आदेश दिले. दरम्यान, गुरूवारी तालुुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर व्यवहारे, मंडळ कृषी अधिकारी प्रभाकर सपकाळ, कृषी सहाय्यक सुनील रोकडे, सरपंच शिवाजी पुंगळे हे शेतकऱ्यांसह पंचनामे करण्यास गेले. तथापि, पंचनामे करीत असताना दूरवरच्या पिकांना आता रिअ‍ॅक्शन येण्यास सुरूवात झाल्याचे कृषी विभागाच्या निदर्शनास आले. त्यामुळे बाधित पीक क्षेत्र निश्चित करता येत नाही. या परिस्थितीमुळे काही दिवस पंचनामे पुढे ढकलण्यात आल्याची माहिती कृषी विभागाने दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पोलिस खात्याकडून जबाब घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.