शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल संपाचा प्रवेश प्रक्रियेला साईड इफेक्ट !

By admin | Updated: August 7, 2014 01:41 IST

लातूर : मराठा व मुस्लिम समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या तंत्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे.

लातूर : मराठा व मुस्लिम समाजाला नुकतेच आरक्षण जाहीर केले आहे. त्यानुसार सध्या सुरू असलेल्या तंत्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जात आहे. परंतु, महसूलचा संप सुरू असल्याने प्रमाणपत्र वितरण व प्रस्ताव स्वीकारण्याची यंत्रणाच बंद पडली आहे. त्यामुळे मराठा व मुस्लिम समाजासह आरक्षित जागेवरील प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. १ आॅगस्टपासून महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपात तहसीलदारांसह नायब तहसीलदार व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जात प्रमाणपत्रासाठी १ आॅगस्टपूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावावरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे अनेक मराठा व मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र मिळू शकले नाही. त्यातच इकडे तंत्रनिकेतनची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आरक्षणातून प्रवेश घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची गरज लागते. मात्र जिल्ह्यातील दहाही तालुक्यांतील तहसीलचे काम संपामुळे ठप्प झाले आहे. प्रमाणपत्र देणे व प्रस्ताव स्वीकारणे हे कामकाज बंद आहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबींचा विचार करून जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांकडे पत्र पाठविले आहे. महसूलचा संप सुरू असल्याने विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देणे अशक्य आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ द्यावी, अशी विनंती या पत्रात जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. परंतु, अद्याप तसे तंत्र संचालनालयाकडून काही निर्देश नाहीत. १४ आॅगस्टपर्यंतच प्रवेश प्रक्रिया राहणार आहे. १४ आॅगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळणे गरजेचे आहे. परंतु, इकडे संपावर अद्याप तोडगा निघाला नाही. त्यामुळे विद्यार्थी, पालक चिंतेत आहेत. (प्रतिनिधी)प्रमाणपत्रांअभावी विद्यार्थ्यांना प्रवेश नाही मिळाल्यास सनदशीर मार्गाने मोठे आंदोलन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद उभा करेल. जिल्हाधिकाऱ्यांना मंगळवारीच संघटनेचे शिष्टमंडळ भेटले आहे. त्यांनी तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संचालकांना पत्र पाठविले आहे. ४मुदतवाढ मिळाली तर ठिक आहे. परंतु, समाजाच्या हितासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी संप मागे घेणे हिताचे ठरेल, असे वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष विद्याधर कांदे-पाटील म्हणाले.