सिल्लोड : येथील सिद्धेश्वर अर्बन को-आॅप. बँक निवडणुकीत आ. अब्दुल सत्तार व प्रभाकरराव पालोदकर यांच्या सहकारमहर्षी दादासाहेब पालोदकर सहकार विकास पॅनलचे सर्वच्या सर्व १३ संचालक मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. या विजयी उमेदवारांची सोमवारी संध्याकाळी शहरातून मिरवणूक काढण्यात आली.निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून विष्णू रोडगे यांनी काम पाहिले. त्यांना या कामी सहायक निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून दिलीप जैस्वाल, शकील पठाण, बी.टी. कुंभारे, डी.पी. किंबहुने, एस.एम. अभ्यंकर, पी.डी. झरेकर यांनी मदत केली. सिद्धेश्वर बँक निवडणुकीत रविवारी २२ मतदान केंद्रांवर ९ हजार ५०८ मतदानापैकी ६ हजार ७४३ मतदान झाले होते. या निवडणुकीत सहकार विकास पॅनलचा विजय झाला, तर विरोधी मुर्डेश्वर पॅनलचा जवळपास २७०० ते २८०० मतांनी पराभव झाला.सर्वसाधारण मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार बालाजी कळात्रे (१६६७), ज्ञानेश्वर काकडे (१६५७), ज्ञानेश्वर गोरे (१६१९), सुदाम जंजाळ (१६४१), राजेंद्र ठोंबरे (१६६७), देवीदास पंडित (१६५०), विनोद भोजवानी (१६२०), चंद्रशेखर साळवे (१७०१)महिला मतदारसंघातीलविजयी उमेदवाररुक्मिणी गोडसे (४५१४), कुशीवर्ता बडक (४५३०) महिला मतदारसंघातीलपराभूत उमेदवार कल्पना प्रशाद (१७९८), सरला सोनवणे (१६६५) या मतदारसंघात एकूण २०९ मते बाद झाली.अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघविजय खाजेकर (विजयी ४७४१), अंबादास सपकाळ (पराभूत १८२०) या मतदारसंघात १८२ मते बादझाली.एनटी-व्हीजेएनटी मतदारसंघअभय वाघ (विजयी ४७४१), गोविंदा भोजने (पराभूत १७९४) या मतदारसंघात २०६ मतदान बाद झाले. ओबीसी मतदारसंघनंदकिशोर सहारे (विजयी ४७२०), दत्ता कुडके (पराभूत १८०१) या मतदारसंघात २१९ मते बाद झाली.
सिद्धेश्वर बँक पुन्हा पालोदकरांकडेच
By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST