औरंगाबाद : मराठवाड्यातील एकमेव अशा मनपाच्या सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातील प्राणी दत्तक योजनेला घरघर लागलेली असताना अजित सीड्स या कंपनीने सिद्धार्थ आणि समृद्धी या पिवळ्या वाघांच्या जोडीला आणखी एक वर्षासाठी दत्तक घेतले आहे. त्यांच्या तीन पिलांचे नामकरणही उद्यानात पार पडले. कंपनीने २ लाख रुपयांचा धनादेश पालिकेला सुपूर्द केला आहे. सिद्धार्थ व समृद्धी या जोडीला मार्चमध्ये तीन पिले झाली. त्यामध्ये दोन नर व एक मादी पिलाचा समावेश आहे. त्यांच्याही संगोपनाची जबाबदारी कंपनीकडे गेली आहे. अर्जुन, नकुल आणि दुर्गा, अशी त्यांची नावे ठेवण्यात आली आहेत.प्राणिसंग्रहालय संचालकांचे मतप्राणिसंग्रहालय संचालक डॉ. बी.एच. नाईकवाडे म्हणाले की, ४ वर्षांपूर्वी प्राणी दत्तक योजना आली. त्यानुसार संग्रहालयातील दोन पिवळे वाघ दत्तक देण्यात आले. संग्रहालयाचा दर्जा वाढावा, प्राण्यांचे आरोग्यमान उंचवावे, त्यांना चांगले वातावरण मिळावे. यासाठी चांगले अर्थसाहाय्य उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ही योजना आहे. सलग चौथ्या वर्षासाठी सिद्धार्थ व समृद्धीसह त्यांच्या तीन पिलांचे पालकत्व अजित सीड्सचे समीर मुळे यांनी घेतले आहे. या वर्षासाठी २ लाखांचा धनादेश त्यांनी दिला. मुळे यांच्यासह व्यवस्थापक आर.के. पिल्लई, स्वप्नील स्वामी आदींनी पाहणी केली.
सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील वाघांचे झाले बारसे...
By admin | Updated: September 27, 2014 00:56 IST