जालना : आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात थांबावे असा एक संकेत आहे. मात्र लोकमतने सोमवारी सकाळी अकरा ते एक वाजे दरम्यान विविध कार्यालयांचे स्टिंग आॅपरेशन केले असता कार्यायल प्रमुख तसेच अनेक कर्मचारी गायब आढळून आहे. यामुळे कामांसाठी आलेल्या नागरिकांचा भ्रमनिरास झाला.नगर पालिका कार्यालयापासून सुरूवात करण्यात आली. यात प्रशासकीय अधिकाऱ्यांचे दालन बंद होते. सामान्य प्रशासन विभागात तीन महिला कर्मचारी काम करताना दिसून आल्या. बांधकाम विभागात तर कोणीच नव्हते. वाघमारे नावाचे कर्मचारी संगणकावर काम करत होते. त्यांना विचारणा केली असता सर्व कर्मचारी कर वसुलीला गेल्याचे सांगितले. मुख्य अभियंतेही दिसले नाहीत. विवाह नोंदणी कार्यालय बंदच आढळून आले. नगररचना विभागातही चार ते पाच कर्मचारी कामात व्यस्त होते.आवाक जावक विभागत दोन कर्मचारी होते. जिल्हा परिषदेतही विविध वीस पेक्षा अधिक विभागांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात पशुधन विभागाचे अधिकारी तसेच बहुतांश कर्मचारी गायब होते. दोन कर्मचारी कामात होते. शिक्षण, आरोग्य, सामान्य प्रशासनासह अनेक विभागात पाच ते सात कर्मचारी आढळून आले. मुख्याधिकाऱ्यांचेही दालन बंदच होते. विविध विभागांचे विभागप्रमुख जागेवर नव्हते. काहीजण मिटिंगला तर काहीजण दौऱ्यावर गेल्याचे सांगून कर्मचाऱ्यांनी सारवासारव केली. जिल्हाधिकारी कार्यालयातही भूमि अभिलेख, भूमि अधीक्षक कार्यालातही कर्मचाऱ्यांची वाणवा होती. (प्रतिनिधी)
कार्यालयांमध्ये शुकशुकाट..!
By admin | Updated: December 14, 2015 23:53 IST