शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम जन्मोत्सव उत्साहात

By admin | Updated: April 4, 2017 23:13 IST

लातूर : शहरासह जिल्हाभरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला.

लातूर : शहरासह जिल्हाभरात प्रभू श्रीराम जन्मोत्सव सोहळा मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते. शहरातील कोकाटे नगरातील राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सवाचा पाळणा घालण्यात आला. गावभागातील राम गल्लीतील राम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, कीर्तन, भजन झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. तर रूई रामेश्वर येथे माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने श्रीराम-रहीम सेतूचे लोकार्पण करण्यात आले.प्रकाश नगरमधील गजानन महाराज मंदिर, बोधेनगरातील संत नामदेव मंदिर, बार्शी रोडवरील श्री हनुमान मंदिर, औसा हनुमान मंदिरात श्रीरामनवमी उत्साहात साजरी करण्यात आली. महिला भाविकांनी श्रीराम जन्मोत्सवाचा गाऊन उत्सव साजरा केला. प्रकाशनगर येथील गजानन महाराज मंदिरात श्रीराम-लक्ष्मण-सीता आणि हनुमानाची पूजा करून महाआरती करण्यात आली. यावेळी गजानन महाराज भजनी मंडळाने श्रीराम स्तुतीपर भजने गायली. मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल होती. दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केली होती. लातूर तालुक्यातील रामेश्वर (रूई) येथे माईर्स एमआयटी संस्थेच्या वतीने सोनवळा नदीवर उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी श्रीराम-रहीम मानवता सेतूचा लोकार्पण सोहळा झाला. यावेळी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, माईर्सचे संस्थापक प्रा.डॉ. विश्वनाथ कराड, संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, माजी केंद्रीय मंत्री अरिफ मोहम्मद खान, डॉ. राजेंद्र शेंडे, माजी खा.डॉ. गोपाळराव पाटील, वेदप्रताप वैदिक, फिरोज बख्त अहेमद, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु एस.एन. पठाण, तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, प्रा. राहुल विश्वनाथ कराड, प्रा.डॉ. मंगेश कराड, रमेश कराड आदी उपस्थित होते.