शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

अपघाताच्या धक्क्यात विरले मुख्यमंत्र्यांचे श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2017 00:31 IST

लातूर : निलंगा तालुक्यातील हलगरा येथे पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमातील श्रमदानाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली.

लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : निलंगा तालुक्यातील हलगरा येथे पाणी फाऊंडेशनच्या उपक्रमातील श्रमदानाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. जवळपास २० ते २५ मिनिटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जय भवानी मित्र मंडळाचे कार्यकर्ते आणि गावकऱ्यांसमवेत श्रमदान केले. मात्र हेलिकॉप्टर अपघाताच्या धक्क्यात मुख्यमंत्र्यांनी केलेले श्रमदान विरले. मराठवाड्यातील भाजपाच्या शेतकरी संवाद सभेच्या निमित्ताने मुख्यमंत्री निलंग्यात मुक्कामी होते. हलगरा, औराद शहाजानी, अनसरवाडा आदी गावांत संवाद सभा घेऊन विविध विकास कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली. हलगरा येथे आयोजित श्रमदान कार्यक्रमातही शेतकऱ्यांशी संवाद साधला. हलगरा गावातील गावकऱ्यांनी लोकसहभागातून केलेल्या जलयुक्त शिवारच्या कामाचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. झालेले काम हे आदर्शवत आहे, असे ते म्हणाले.मुख्यमंत्र्यांची संवाद सभाही झाकोळून गेली...विकास कामांच्या पाहणीबरोबरच मुख्यमंत्र्यांची शेत-शिवार संवाद सभा होती. राज्यभरात गुरुवारीच या संवाद सभेला सुरुवात झाली. लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मराठवाड्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शेत-शिवार संवाद सभेतून केंद्र व राज्याने शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. ४केंद्र व राज्य शासनाने गेल्या अडीच-तीन वर्षांत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारपेक्षा मोठ्या फरकाने निधी खर्च करून शेतकरी कर्जमुक्तीच्या वाटेवर आणल्याचे या सभेतून सांगण्यात आले. मात्र अपघातामुळे संवाद सभा आणि श्रमदान विरले.