शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आराखड्यावर ‘दुकानदारी’

By admin | Updated: January 12, 2016 00:07 IST

औरंगाबाद : सुधारित विकास आराखडा सादर होताच शहरात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. आराखड्यात काही वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत

औरंगाबाद : सुधारित विकास आराखडा सादर होताच शहरात अनेकांनी दुकानदारी सुरू केली आहे. आराखड्यात काही वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत. ही आरक्षणे उठवून देण्याच्या नावाखाली स्थानिक नागरिकांकडून पैसे उकळण्याचा उद्योग काही जणांकडून सुरू आहे. बेघर होण्याच्या भीतीने हादरलेल्या नागरिकांकडून हजारो रुपये उकळले जात आहेत, तर काही जणांनी आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न चालविला आहे. मनपाच्या वाढीव हद्दीचा सुधारित विकास आराखडा पंधरा दिवसांपूर्वीच सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला. हा आराखडा राज्याच्या नगररचना खात्याकडून तयार करण्यात आला आहे. यामध्ये वाढीव हद्दीतील बहुतांश ग्रीन झोन येलो म्हणजे निवासी वापरासाठी परावर्तित करण्यात आले आहेत. तरीदेखील काही भागात नागरी वसाहतींवर वेगवेगळी आरक्षणे पडली आहेत. त्यामुळे तेथील नागरिक हवालदिल झाले आहेत. त्याचाच फायदा घेत शहरात अनेक दलाल सक्रिय झाले आहेत. राजनगर, मुकुंदवाडी, जाधववाडी, हर्सूल, बंबाटनगर, भारतनगर, गारखेडा, अंबिकानगर आदी भागात हे दलाल फिरून आरक्षण उठवून देण्याच्या नावाखाली लोकांकडून पैसे वसूल करीत आहेत. शहरातील विविध भागातून आलेल्या शिष्टमंडळातील नागरिकांनीच सोमवारी महापौरांकडे अशा आशयाची तक्रार केली. त्यावर महापौरांनी या नागरिकांना कुणालाही पैसे न देण्याचे आवाहन केले. नागरिकांनी केलेल्या या तक्रारींमुळे शहरात दलालांकडून लूट सुरू असल्याची बाब समोर आली आहे. सुधारित विकास आराखड्यातील आरक्षणांच्या मुद्यावरून शहरात राजकारणही जोमात सुरू आहे. मनपातील सत्ताधारी शिवसेनेने या मुद्यावर रान उठवून ते इनकॅश करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ४ वेगवेगळ्या भागात सेनेचे स्थानिक पुढारी फिरत असून लोकांना आरक्षणांची माहिती देत आहेत. त्यानंतर संबंधित भागात नागरिकांच्या बैठका घेऊन त्यांना धीर देण्याचे कामही सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून केले जात आहे. काही भागात छोटीखानी सभा भरवून त्यात लोकांना आरक्षण बदलण्याचे आश्वासन दिले जात आहे.